पान:महमद पैगंबर.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ पाकिस्तानचे संकट पायया होत. बंडाचा बीमोड करण्यासाठीं सैन्य रवाना करणे ही या उपक्रमांतली चौथी पायरी होय. अशा रीतीने रक्तपात झाला, गोंधळ माजला व राज्ययंत्र खिळखिळे झालें कीं, सात्त्विकपणाचे सोंग उभे करणे ही अखेरची पायरी होय. 'आम्हांला न्यायाची चाड फार; म्हणून इथे आम्ही मोठ्या नाखुषीने राहिलों' असे आकाशांतल्या बापाची आठवण व आळवण करून सांगणे आणि आमचा पाय येथून निघाला तर या ठिकाणी जी दुरवस्था निर्माण होईल तिच्याकडे स्थितप्रज्ञाच्या शांत वृत्तीने पाहणे कोणत्याहि सुसंस्कृत सत्ताधा-याला सहन होणार नाही अशी बढाई मारणे हीं या सोंगाच्या बतावणीची अंगे आहेत.) व्यापार व राजकारण या दोन हेतूंच्या सिद्धयर्थ सान्या जगभर पिंगा घालणा-या ख्रिस्ती राष्ट्रांच्या आक्रमक वृत्तीची परिणति कसकशी होते याचे वर्णन वरील अवतरणांत केलेले असून, ब्रिटिश लोकांच्या हिंदुस्थानांतल्या राज्यविस्तारालाहि तें लागू पडते. हिंदु-हिंदू मधला फुटीरपणा, मुसलमानमुसलमानांमधला वेबनाव, हिंदु-मुसलमानांमधले हेवेदावे यांचा आपल्या राज्यविस्ताराला प्रसंगी किती नामी उपयोग होतो याचा अनुभव, राज्यविस्ताराची चटक लागल्यावर, इंग्रजांना लौकरच येऊ लागला होता. वंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांचे सुभेदार अलिवर्दीखान व सिराजउद्दौला यांची सत्ता पोखरतांना त्यांना राजा तिलूचंद, रायवल्लभचा मुलगा किसनदास व पंजाबी व्यापारी अमीनचंद (बंगाली उमीचंद नव्हे) यांचा पुष्कळचे उपयोग झाला होता.* पूर्व भारत पचविण्याची पहिली पायरी म्हणून क्लाइव्हनें त्या भागांत दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली व त्याने सत्ताधारी नवाबाला नामधारी बनविले. या कामीं महमद रेझाखान हा क्लाइव्हच्या उपयोगी पडला होता. रेझाखानला निष्प्रभ करतांना वॉरन हेस्टिग्जनें नंदकुमाराच्या खटाटोपी स्वभावाचा भरपूर उपयोग करून घेतला व शेवटीं नंदकुमारावरच बालंट रचून त्याने त्याचा कांटा कायमचा दूर केला. या गोष्टी ब्रिटिश सत्तेच्या उत्कर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या असल्या तरी, ‘प्रसादचिन्हानि पुरः फलानि' या न्यायाने त्या सूचक आहेत. वॉरन

  • Rise of the Christian Poer in the East, Vol. I, PP• 62-75.