पान:महमद पैगंबर.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास २५ हेस्टिग्जच्या या सर्व कारस्थानांना इंग्लंडमधल्या त्याच्या धन्यांची पूर्ण मान्यता होती हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. सातारा, नागपूर, झांशी, संबळपूर, तंजावर, अयोध्या वगैरे संस्थाने खालसा करण्याचा डलहौसीने धूमधडाका चालविला व ज्या निजामाच्या परधाजणेपणामुळे इंग्रजांना हिंदुस्थानांतल्या अनेक राज्यसत्ता धुळीस मिळवितां आल्या त्या निजामाचा वहाड प्रांतहि डलहौसीने ताब्यात घेतला! हे पाहून हिंदु व मुसलमान अशा दोन्ही धर्माच्या संस्थानिकांनी हे ओळखले कीं, एकेका सत्ताधीशाला वेगवेगळा काढून, हिंदुस्थानांत आपल्या सत्तेचा विस्तार करणारे इंग्रज आतां हिंदुस्थानचा सगळाच नकाशा लाल रंगाने भूषविण्याच्या मार्गात आहेत ! इंग्रजांच्या सत्तावाढीमुळे शिरजोर बनलेल्या कांहीं मिशनच्यांनी धर्मप्रसार करतांना अतिरेक चालविला असल्याचाहि बोभाटा होऊ लागला. अशा कारणांनी समाजांत अनेक ठिकाणी असंतोष दड़न राहिला होता. त्या दारूच्या कोठारांत कसली तरी ठिणगीच पडावयाची राहिली होती. काडतुसांना लावण्यांत आलेल्या चरबीचा बोभाटा झाला आणि हे कोठार भडकू लागले. सुडाची भावना कितीहि काळ सुप्तावस्थेत राहिली तरी ती नष्ट होत नाहीं, (Vengeance sleeps long but never dies.) अशा आशयाची एक म्हण इटॅलियन भाषेत आहे. ती या प्रसंगी दोन परस्परविरोधी तन्हांनी प्रत्ययाला आली. दिल्ली-लखनौच्या राजघराण्यांचे इस्लामी अभिमानी नाराज झालेले होते. सातारा, झांशी, नागपूर या संस्थानांना झळ लागल्यामुळे व नानासाहेब पेशव्यांसारख्या मानी व पराक्रमी पुरुषाची मानखंडना करण्यांत आल्यामुळे संत्रस्त झालेले हिंदूहि प्रसंगाची वाट पाहात होते. सूडाच्या भावनेने या सगळ्यांची जबरदस्त जूट जमून आली. पण, सूडाच्याच भावनेच्या वेगळ्या प्रकारच्या लीलेमुळे शीख व गुरखे या संग्रामांत सामील झाले नाहींत. धर्मच्छलकांचा बदला घेण्यांत बाणेदारपणा दाखविणा-या शिखांच्या मनांत, गुरुगोविंदसिंग व बन्दा यांचे दिल्लीच्या इस्लामी सत्तेकडून झालेले हाल शल्यासारखे रुतून बसले होते. प्रसंग सांपडेल तेव्हां दिल्ली शहर भरदिवसा लुटण्याची जागृति: *IRise of the Christian Power in the East, Vol. III, pp. 9-13.