पान:महमद पैगंबर.djvu/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७२ ] तो तुमच्यांतील मतभेदाचा खुलासा करून देईल. मूटा येथील लढाई व टेबुकावरची स्वारी ह्या दोन्ही गोष्टी घडून येण्याची कारणे ह्मटलीं ह्मणजे त्या देशांत पैगंबराने जे आपले वकील पाठविले होते त्यांस हेल्लेणी ख्रिस्ती लोकांनी ठार केलें हैं होय. ह्या लोकांचे पारिपत्य पैगंबराच्या हातून न होतां पुढे त्याच्या शिष्यांनी केले. राष्ट्राची परस्परांमध्ये नीति कशी असावी ही गोष्ट कुरान धर्मशास्त्रांत सांगितली आहे. त्या ग्रंथांत विनाकारण लढाई करण्याविषयी सांगितलें नाहीं. मुसलमान लोक समस्त परधर्मीयांस असे सर्वदां ह्मणत की, आमच्याशी तुह्मी तंटा करूं नका; व आमचे दोस्त व्हा; आणि आह्मी तुमच्याशी विश्वासाने वागू. हे पसंत पडल्यास आह्मांस खंडणी द्या; व आह्मी तुमचा सर्व प्रकारे प्रतिपाळ करूं. तुह्मांस कोणाकडूनहि इजा होऊ देणार नाही. तुमचे हक्क जितके असतील तितके तुह्मी पाळा. खंडणी देणे तुह्मांस पसंत नसेल तर आमच्या धर्माचा अंगीकार करा. ह्मणजे आमचे जे जे हक्क आहेत ते तुह्मांस मिळतील व त्यांचा तुह्मी सुखाने उपभोग व्या. युद्धसंग्रामाच्या संबंधाने जे नियम पैगंबराने लावून दिले आहेत, त्यांवरच लढाईची तजवीज सर्व मुसलमान लोक बांधतात. ते नियम साधारणतः हे आहेत की जे तुमच्यावर शस्त्र धरितात, त्यांच्याबरोबर तुह्मी परमेश्वराने दिलेल्या धर्मासाठी लढाई करा. पण