पान:महमद पैगंबर.djvu/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७१ ] यांस तसेच नाजरानकरांचे बिशप, प्रीस्ट व संन्याशी आणि जती यांस परमेश्वराच्या पैगंबराकडून लिहून जाते कीं, आजतागाइत जे तुह्मी आपले धर्माचे सानथोर आचार व विधी आपआपल्या देवळांत, मठांत व प्रार्थनादि भक्तीचे स्थळीं पाळीत आला ते सर्व तुह्मीं बिनधोक या पुढेहि पाळावे. कोणताहि बिशप आपल्या गादीवरून दूर केला जाणार नाही. कोणताहि संन्याशी आपल्या मठांतून काढला जाणार नाहीं, व कोणताहि प्रीस्ट आपल्या कामावरून दूर केला जाणार नाही. त्यांचे हक्कांत व अधिकारांत कोणत्याहि प्रकारे फेरफार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यांत ज्या गोष्टी चालू आहेत त्या तशाच कायम ठेविल्या जातील. जोपर्यंत तुह्मी शांत बुद्धीने व नीतीने आपलें आचरण ठेवाल तोपर्यंत तुमच्यावर बळजबरी होणार नाहीं. तुह्मीहि कोणावर बळजबरी करूं नका. अशाविषयीं परमेश्वराकडून व त्याच्या पैगंबराकडून तुह्मांस अभिवचन दिले जात आहे. तरवारीच्या बळावर आपल्या धर्माचा फैलाव करावा हें पैगंबराच्या स्वभावाला आवडत नसे. तसेच धर्ममताच्या बाबतींत वितंड वाद करण्याचा त्याला तिटकारा असे. पुनः पुनः तो ह्मणे कीं, जे तुह्मांस माहित नाहीं, त्याचा वितंडवाद कां करीत बसतां? सत्कृत्ये करण्यांत परस्परांवर एकमेकांनी सरशी करावी. ज्या वेळी तुह्मी परमेश्वराकडे जाल त्या वेळी