पान:महमद पैगंबर.djvu/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २७० ] वचन बोलत जा. जो तुझे वाईट करील, त्याचे तू कल्याण कर. हा उपदेश दुर्बळ माणसाचा नव्हता, तर ज्याच्या हातांत सर्व सत्ता होती, फौजफांटा होता, राज्याची सर्व सूत्रे होतीं, अशा माणसाने हा उपदेश केला होता. निबल असे पुष्कळ धर्मवीर सांगतात की, शांतीच्या मार्गाचा अवलंब करा. राज्यकार्यधुरंधर हे सत्ता हातीं नसली ह्मणजे सांगतात की, आपल्या वर्तनांत पुष्कळ साम ठेवावे; परंतु तीच सत्ता हाती आली ह्मणजे उपदेशाचा झोंक सर्वस्वीं बदलतो. पैगंबराने जेव्हां मक्केच्या जुन्या मंदिरांत आपल्या फौजेनिशीं प्रवेश केला, त्या वेळीं तो ह्मणाला सत्याचा विजय झाला. अंधःकाराचा लोप झाला. असे बोलून त्याने एकदोघे शिवायकरून बाकीच्या सर्व मक्केकर लोकांस माफी दिली. दुर्बळ व अनाथ यांचे संरक्षण करण्याची आज्ञा दिली; आणि दास होते त्यांस मुक्त केले. त्याने बाकीच्या सर्व लढाया अशाच धर्तीवर केल्या. पराजय पावलेल्या लोकांपासून थोडाबहुत कर घेऊन त्यांस आपापल धर्मसंबंधी आचारविचार पाळण्याची तो मुभा देत असे. एकदां कराची रक्कम ठरल्यावर जर कोणी पराजित लोकांच्या धर्मकृत्यांत हात घातला तर इस्लामी धर्माविरुद्ध आचरण केल्याचा दोष अशा माणसावर येई. नाजरान गांवच्या ख्रिस्ती लोकांस पैगंबरानें जो जाहीरनामा पाठविला तो खालीं दिला आहे. * बनीहारीसकरांचे बिशप