पान:महमद पैगंबर.djvu/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६९ ] काम करून घेणे असल्यास तह करावा; व आपल्या सोयीस। पडेल त्या वेळीं तो तह मोडावा. परराष्ट्रांचे स्वातंत्र्य ह्मणजे कवडीमोल अशी प्राचीन लोकांची समज असे. ज्या समयीं जगांत नैतिक व सामाजिक विषयांच्या बाबतींत अज्ञान होते, त्या वेळीं पैगंबराने सर्वत्र समता आहे, कोणाचाहि दुर्जा कमी नाहीं व जास्तहि नाहीं अशा नियमांचा आचारविचार प्रसिद्ध केला ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. महमदाचे लोकांस ह्मणणे असे असे की, तुह्मी इस्लामी धर्माचा अंगीकार करा. पण कोणावरहि बळजबरी करून महमदाने आपला धर्म स्थापन केला नाहीं. जे कोणी त्या धर्माचा अंगीकार करीत त्यांस मुसलमानांचे हक्क व अधिकार मिळत. जे परधर्मी लोक इस्लामी राजांचे अमलाखाली राहात, त्यांस आपापल्या देवाची भक्ति करण्याची मुभा असे. कुरानांत सांगितले आहे कीं, धर्माच्या बाबतींत कोणावर बळजबरी होऊं नये. यावरून सिद्ध होतें कीं इस्लामी अमलाखाली राहाणाच्या प्रजेस धर्मसंबंधीं बाबतींत सर्व प्रकारची मोकळीक असे. एका स्थळीं असे सांगितले आहे कीं, विश्वास तर परमेश्वराकडूनच प्राप्त होतो, असे आहे तर तू विश्वास धरावा ह्मणून मनुष्यावर बळजबरी करणार काय ? अशा प्रकारे बळजबरीचे आचरण न करितां ने तुला सोडून जातात त्यांस चिकटून राहा. आपल्या अंतःकरणाला ग्वाही ठेवून सत्य