पान:महमद पैगंबर.djvu/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६८ ] ह्याच्या सुखदुःखाचे विभागी मदीनेकर झाले, तसाच पैगंबर त्यांच्या सुखदुःखाचा वांटेकरी झाला. मूर्तिपूजक व त्यांचे दोस्त यांनी मुसलमान लोकांचा छळ मांडिला होता. त्यामुळे त्यांच्या हालचालीचे धोरण कोणीकडे आहे हे डोळ्यांत तेल घालून पहाणे पैगंबरास भाग पडले. एकट्या मदीना शहराने देशांतील समस्त लोकांशी सामना करणे मोठे कठीण काम होते. हळू हळू सामोपचाराने अरबस्थानांतल्या निरनिराळ्या जाती पैगंबरास येऊन मिळाल्या व एका निराकार परमेश्वराची भक्ति करूं लागल्या. ह्या धरित्रीवरच्या सर्व लोकसमुदायांत अरब लोक नास्तिक, दांभिक, तापट व उग्र, आहेत. अशा लोकांस, आपल्या मनोविकारांस आवरून कसे धरावे याचा धडा पैगंबराने उत्तम प्रकारे घालून दिला. ही मोठी नवल करण्यासारखी गोष्ट आहे. शांततेच्या समयीं व लढाईच्या समयीं राष्ट्रांचे परस्परांमध्ये वर्तन कसे असावे याबद्दल नियमबंधन त्या कालापर्यंत मुळीच नव्हते. राष्ट्रामध्ये व निरनिराळ्या जातींमध्ये युद्धसंग्राम झाला ह्मणजे जो विजयी होईल त्याने पराजय पावलेल्या लोकांमध्ये जे अंगाने बळकट त्यांची कत्तल उडवावी, जे निराश्रित व निरपराधी त्यांस दास बनवावे, घरांतील मालाची लूट करावी, अशी वहिवाट रोमी लोकांची सत्ता प्रबळ होती त्या वेळी सुद्धा होती. आसमंतात्भागींच्या राष्ट्रास जिंकून अंकित करून ठेवावें; हाच काय तो प्राचीन लोकांच्या लढाईचा उद्देश असे. आपले