पान:महमद पैगंबर.djvu/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६३ ] स्वार्थ साधून घ्यावा, अशी वहिवाट चालत आली होती. परंतु पैगंबराने असा परिपाठ घातला कीं, जी वाजवी रीतीने लढाई झाली असेल व तींत जे लोक पाडाव केले जातील त्यांसच दास्यांत टाकावे, व त्यांची कोणी खंडणी दिल्यास त्यांस सोडून द्यावे; अथवा नोकरी करून ते आपली खंडणी करून घेत असल्यास त्यांस तशी सवड द्यावी. वारंवार तर असे होत असे की, गुलामाने पैगंबराची आग्रहपूर्वक विनंति केल्यास त्या गुलामाची लवकरच सुटका होई. दुस-या लोकांना त्यांच्या देशांतून चोरून आणून त्यांस दास्यत्वांत घालणे अगर गुलामांचा व्यापार चालू करणे, ह्यांची पैगंबराने सक्त मनाई केली होती. पैगंबराच्या शब्दांचा खरा हेतु ह्मटली ह्मणजे दासपणा जगांतून नाहींसा व्हावा असा आहे तेव्हां दासपणा जगांतून नाहींसा करण्याविषयी सर्व मुसलमानांनी झटावे, हे त्यांचे कर्तव्य कर्म आहे. अध्याय १५ वा. जिहाद अथवा इस्लामी धर्माच्या लोकांनी धर्मा करिता केलेली युद्धे. धर्माच्या बाबतींत बळजबरी नसावी. सुरा (२) ओवी २९७. | महमद पैगंबराच्या धर्माचा विस्तार जो अतित्वरेनें झाला, त्याची हकीकत लक्षात ठेवण्यासारखी आहे. पैगंबर