पान:महमद पैगंबर.djvu/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६४ ] मरून पुरीं तीस वर्षे झाली नाहीत तोंच लक्षावधी लोकांनी त्याच्या धर्माचा स्वीकार केला; आणि एक शतक पुरे झाले नाहीं तोंच त्रिखंड पृथ्वीवर त्याच्या धर्माचा प्रसार झाला. हा प्रसार तरवारीच्या जोरावर झाला नाहीं. मदीनेस पैगंबराचे आगमन झाले त्यो समयास अवस व खिजराज या दोन जातींचे आपसांतील तंटे जरी मिटले होते, तथापि त्यांची पुनरुत्पत्ति होण्याचा संभव होता. प्रारंभीं यहुदी लोक मदीनेकर अरबांचा आश्रय धरून असत. हा आश्रय सोडून स्वतंत्र रीतीने राहाता यावे या उद्देशाने बळाची जमवाजमव करण्याच्या तजविजी या समयास त्यांनी चालविल्या होत्या. ज्या मकेकर शिष्यांनी आपल्या गुरूसाठी जीवाचीहि परवा ठेविली नव्हती; व जे उपासमार सोसून व देशत्याग करून त्याच्या बरोबर मदीनेस आले होते, अशा लोकांची संख्या फारच थोडी होती. मदीनेकर लोकांपैकीं फारच थोड्या लोकांनी त्याचे शिष्यत्व प्रथमारंभीं पत्करिले होते. शिवाय मदीनेकरांत एकी नसून फूट होती. मदीनेकरांतील एक सरदार मदीनेचे राज्यपद मिळविण्याचे उद्देशानें मूर्तिपूजकांचे सल्याने वागत असे. यहुदी लोकांची आपसांत जूट होती. त्यांनीं विषप्रयोग व विश्वासघात या साधनांनीं पैगंबराशीं वितुष्ट मांडिलें. | पैगंबराच्या शिष्यसमुदायांत जे नाना जातीचे लोक जमले होते, त्यांची आपसांत जूट जमावी, व त्यांनी परस्परांशी