पान:महमद पैगंबर.djvu/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६२ ] मारूं नये. तर ६ माझ्या तरुण गड्या " अगर ६ माझ्या तरुण गडे' अशी हाक मारावी. | ज्या प्रकारचे अन्न धनी खातो त्याच प्रकारचे अन्न दासास खावयास द्यावे; व जशी वस्त्रे धनी परिधान करितो तशीच वस्त्रे दासास परिधान करण्यास द्यावीं. गुलाम करते वेळी कोणाहि लेकरांस त्यांच्या आईपासून दूर करू नये. भावास भावापासून दूर करूं नये. बापास लेंकरांपासून दूर करूं नये. नवराबायकोची ताडातोड करू नये. अथवा गणगोतांचीं माणसे एकमेकांपासून दूर करू नयेत. दास्यत्व असल्यामुळे मनुष्य नीच गणतां कामा नये. कारण दास्यत्व में प्रसंगोपात्त चांगल्या स्थितींतल्या मनुष्यांसहि प्राप्त होते; ही स्थिति आज आहे तर उद्यां नाहींशी होईल, अक्षयींची नाहीं. झैद याजला पैगंबराने दासपणांतून मुक्त केले होते व त्याजकडे सर्व सैन्याचे आधिपत्य दिले होते; आणि मोठमोठ्या कुळांतील सरदार मोठ्या आनंदाने त्याच्या हाताखाली काम करीत असत. हेल्लेणी लोकांवर जी स्वारी केली त्या स्वारीवरचे सैन्याचे आधिपत्य अबूबकराने झैद याचा मुलगा ओसेमा याजकडेसच सोपिलें होतें. लढाईत जे कैदी सांपडतील मग ते पुरुष असोत अगर स्त्रिया असोत त्यांनांच दास करावे, इतरांस करूं नये असा कुरानाचा बोध आहे. पैगंबराच्या पूर्वी गुलामांचा व्यापार चालत असे. योग्य अगर अयोग्य लढाईत सांपडेल त्यास गुलाम करून किफायतीने लोकांस विकावे, व आपला