पान:महमद पैगंबर.djvu/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६१ ] वागणूक स्नेहाची असते, तशीच स्नेहाची वागणूक गुलामाबरोबर असावी, असा पैगंबराने नियम घालून दिला. गुलामांची बंदांतून मुक्ति सढळ हातांनी करावी. आपल्या द्रव्यांतील हिस्सा त्यांस द्यावा. आपले ताब्यांतील दासीश संभोग करण्याची इच्छा धरूं नये; परंतु तसा प्रसंग घडून आल्यास दासीस आकाशांत अक्षय सुखलाभ होईल असे अभिवचन त्याने दिलेले आहे. तसेच दासीपासून झालेली संतती स्वतंत्र समजली जाईल व धन्याच्या मरणानंतर दासींना स्वातंत्र्य मिळेल असे ठरविले आहे. एखाद्या मुसलमानाची जर हत्या झाली तर गुलामास मुक्त करणे हे प्रायश्चित्त योजिले आहे. कांहीं प्रकारचे असत्य भाषण झाल्यास गुलामाची सुटका करावी, ह्मणजे मनुष्यास प्रायश्चित्त मिळून तो निर्दोष होतो. जो एकदां दासपणांत सांपडला त्याने जन्मभर त्याच स्थितींत राहावे असा इस्लामाचा हेतु कधीहि नव्हता. पैगंबराने असे स्थापिलें होतें कीं, परदेशांतील मनुष्य इस्लामी राजाच्या राज्यांत जर पळून आला तर त्याला मुक्त करावे. गरीबांच्या पोषणाकरितां ह्मणून जो एक कर घेत त्यांतील कांहीं रकम गुलामांना मुक्त करण्याकडे लावावी असाहि नियम केला. धन्यांनीं गुलामांकडून वाजवीपेक्षां फाजील काम करून घेऊ नये अशी पैगंबराची सक्तीची ताकीद असे. गुलाम ह्मणून दासांस धन्यांनी हाक