पान:महमद पैगंबर.djvu/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६० ] गुलामांस बंधांतून मुक्त करण्याइतकी दुसरी कोणतीहि गोष्ट परमेश्वराला प्रिय नाहीं. विहित आचार करण्यांत अंतर पडल्यास त्याची क्षमा गुलामांची सुटका केल्याने होते. त्याने अशीहि आज्ञा केली की, जे गुलाम नोकरी करून नोकरीवर मिळविलेल्या पैशाने आपली सुटका करून घेऊ इच्छितात, त्यांस तसे करू देण्याची सवड द्यावी. ज्या गुलामांस साम्प्रत द्रव्य मिळविण्याचे साधन नसेल, व ज्यांची इच्छा दुसरीकडे जाऊन कामधंदा करून द्रव्यसंचय केल्यावर आपली मुक्तता करून घ्यावी अशी असेल, त्यांच्या धन्याने त्यांच्यापासून करार करून घेऊन त्यांस मुलखावर जाण्याची परवानगी द्यावी. आपली सुटका करून घेण्यास गुलाम लोकांस सरकारी खजिन्यांतून उसने द्रव्य देण्याची पैगंबराने तजवीज करून ठेविली होती. गुलामाने लिहून दिलेल्या करारनाम्यांतील शब्दार्थ कसा करावा याचा संशय पडला तर त्यांत गुलामाच्या फायद्याची गोष्ट ज्या अर्थेकरून निघेल तोच त्या शब्दाचा अर्थ आहे असा निर्णय केला पाहिजे असा कानून त्याने घालून दिला. | मी आपल्या गुलामास मुक्त करीन असे शब्द धन्याच्या मुखांतून चुकून जरी निघाले तरी ते जाणूनबुजून दिलेले वचन आहे असे मानून ते खरे करण्याचे धन्याला भाग आहे. आपल्या गणगोतांतली माणसे, शेजारी, आपल्यासह असणारे प्रवासी, वाट चुकलेले प्रवासी, ह्या लोकांशी जशी आपली