पान:महमद पैगंबर.djvu/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५९ ] अध्याय १४ वा. दास. “जें तुह्मी खातां ते तुमच्या गुलामांस खावयास द्या. आणि जी वस्त्रे तुह्मी परिधान करितां तशीच वस्त्रे त्यांस लेण्यास द्या." | गुलामगिरी ही फार प्राचीनकाळापासून जगांत चालू आहे. मात्र मानवांची जसजशी सुधारणा होत गेली, तसतशी ही गुलामगिरी कमी कमी होत गेली. दुस-याच्या बळाचा उपयोग करून घेऊन आपली मेहनत वांचवून सुख साध्य करून घेणे हे गुलामगिरीचे मूळ. मनुष्यांचे परस्परांशीं कसे वर्तन असावे याविषयी जनसमाजांत निबंध होण्याचे पूर्वी, बळी तो कान पिळी हाच नियम प्रचलित होता. गुलामगिरी जशी रानटी लोकांत होती, तशीच सुधारलेल्या लोकांतहि आजपर्यंत चालत आली आहे. इस्लामी धर्मात जातिभेद किंवा वर्णभेद मानण्याची चाल नाहीं. मानवांची योग्यता सारखीच व दर्जा पण एकच. रणीं, राजदरबारीं, राजप्रासादीं, अथवा परमेश्वरमंदिरीं सर्वांचा मान सारखाच. सर्वजण मोकळ्या मनाने एकमेकांस भेटतात. इस्लामाचा पहिला मुवाझीम ह्मणजे प्रार्थनेस पुकारणारा शिद्दी गुलाम होता. इस्लामानेच गुलामगिरीची पहिल्याने कंबर मोडिली. आपल्या शिष्यांस पैगंबराचा असा उपदेश होता की,