पान:महमद पैगंबर.djvu/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५८ ] करार करण्याचा शिरस्ता आहे; तथापि फलशोभन होतांच अथवा नवरा मरण पावतांच अथवा काडी मोडून दिल्याने नवराबायकोचा संबंध तुटतांच हें धन घेण्याचा बायकोला हक प्राप्त होतो. आपणास नव-याने बक्षीस दिलेलें धन वसूल करण्यापुरता बायकोचा आपल्या मयत नवग्याच्या मिळकतीवर हक्क चालतो. नव-याने बायकोस जें धन बक्षीस देण्याचे कबूल केले असेल त्याची रकम केवढीहि असली तथापि ती कायद्याप्रमाणे बायकोला मिळू शकते. बक्षीसाची रकम अमुक असे ठरलेले नसल्यास त्या स्त्रियेच्या बापाच्या कुळांतील दुस-या स्त्रियांनां जी रकम मिळाली असेल तिच्या मानाने तिला मिळते. बक्षीस द्यावयाचें धन कर्जादाखल समजले आहे. कानुनांत सांगितला आहे त्यापेक्षा जास्त हक लग्न झाल्यामुळे स्त्रीवर पुरुषाचा बसत नाहीं; व तिच्या स्थावरजंगम धनावर नव-याचा हक्क बसत नाहीं. स्त्रीने मिळविलेले धन नव-याला तिच्या परवानगी शिवाय खर्च करितां येत नाहीं. वयांत आल्यावर आपल्या धनाची व्यवस्था स्त्री स्वतःच करूं शकते. तिला आपल्या नवच्यामार्फत अथवा बापाच्यामार्फत त्याची व्यवस्था केली पाहिजे असे नाहीं. कोर्टात फिर्याद करण्याचा अधिकार तिला आहे. नव-याच्या नांवाने फिर्याद करण्याची जरूर नाहीं. जे पुरुषांस हक आहेत तेच स्त्रियांसहि। आहेत; आणि हें कुरानांत स्पष्ट करून ठेविले आहे.