पान:महमद पैगंबर.djvu/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६७ ] त्यांनी आपली दृष्टि आंवरून ठेवावी, व आचरणांत संयमन ठेवावे. वर वर दिसणाच्या दागिन्यांखेरीज आपले अलंकार लोकांस न दिसतील अशी खबरदारी ठेवावी; व आपल्या पदराने आपले वक्षस्थळ झांकावे. पैगंबराच्या घरांत पडदा नसे. अयेशाबाईने तर अलीविरुद्ध स्वतः लढाई चालविली. पैगंबराची कन्या फातमाबाई ही तर पैगंबराच्या मागून | खलिफता कोणास द्यावयाची ह्या वादांत पुढाकार घेत असे. तशीच पैगंबराची नात झैनाब ही मोठी शूर असे. पैगंबराच्या उपदेशाने एवढे झालें कीं अरबस्थानांत जो अनाचार मानत चालला होता, त्याचा जोर कमी झाला. स्त्रीजातीचा गौरव पैगंबराच्या हातून झाला ही गोष्ट निर्विवाद आहे. स्त्री बाल्यावस्थेत असतां, आपल्या मातापितरांच्या ताब्यांत सर्वस्वी असते; परंतु वयांत आल्यावर कुरानाचे मते स्त्री सर्वस्वी स्वतंत्र होते. आपल्या भावाप्रमाणे तिला आपल्या मातापितरांच्या धनाचा वाटा मिळतो. वयांत आलेल्या स्त्रीचे लग्न तिच्या संमतीशिवाय होत नाहीं. लग्न झाल्यावर तिचे स्वातंत्र्य नष्ट होत नाहीं. ह्मणून लग्नाच्या कराराच्या वेळीं नव-याने बायकोला बक्षीस ह्मणून कांहीं धन देणे अवश्य आहे. हे धन अतिशय ह्मणजे किती असावे ह्याची मर्यादा नाहीं; परंतु ते अगदी थोडकें ह्मटलें तर दहा दर्म ( ह्मणजे सुमारे ३० रुपये. ) इतके असावे; आणि ते लग्न झाल्यावर काही दिवसांनी द्यावे असा | १७