पान:महमद पैगंबर.djvu/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५६ ] प्रयत्न करणे ह्या गोष्टी कुरानांत वारंवार सांगितल्या आहेत. मनुष्य लोभी फार असतो; परंतु बायकांबरोबर दयेने व धर्मबुद्धीने वागला तर परमेश्वर ती गोष्ट विसरणार नाहीं. जर परस्परांत बेबनाव होण्याचा संभव असला तर नव-याचे घराण्यांतील एक दोन पुरुष निवडून घेऊन त्यांस हा परस्परांतील तंटा मोडण्यास सांगावे. परस्परांचा समेट करून घेण्याची इच्छा असल्यास परमेश्वर त्यांस साह्य देईल. ख्रिस्ती, यहुदी, व एक ईश्वर मानणारे असे दुस-या धर्माचे लोक यांच्यांतील सुशील बायकांशी लग्न करण्याची मुभा मुसलमान लोकांस आहे. कुरानांत सांगितले आहे की, आपल्या बायकांबरोबर पवित्र आचरण ठेवा; व्यभिचार करूं नका; व वेश्यागमन करू नका. बायकांनीं बुख घेण्याची चाल, पूर्वीपासून अरबस्थानांत चालत आलेली होती, तेव्हा ती तशीच कायम राहिली. कुरानांत या बाबतींत असे सांगितले आहे की, हे पैगंबरा, तू आपल्या बायकांस, आपल्या लेकींस आणि तुझे जे शिष्य आहेत, त्यांच्या बायकांस सांग की, घराबाहेर चालतांनां तुह्मी आपला बुर्खा सर्व अंगभर खालवर पडू द्या, झणजे त्यांनां लोक इजतदार गरती स्त्रिया आहेत असे सहजच ओळखतील व बीभत्स शब्दांनीं अथवा बीभत्स अंगचेष्टांनी त्यांचा अपमान होणार नाही. विश्वास ठेवणाच्या बायकांस सांग की,