पान:महमद पैगंबर.djvu/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६५ ] सारखे आहेत. नवराबायकोची सुटासूट कायम होण्यापूर्वी ती सुटासूट तीन वेळां झाली पाहिजे; आणि प्रत्येक वेळी एक एक महिन्याचा अवकाश ठेविला पाहिजे. सोडचिट्ठी देतेवेळीं बायको ऋतुमती अथवा अस्पर्श नसावी व गर्भवतीहि पण नसावी. असा प्रकार तीनदा झाला पाहिजे. ह्या दरम्यानचे वेळांत त्याने तिला उघड अथवा गुप्त रीतीने आपल्याकडे बोलावून आणले तर लोटलेली मुदत कामास पडत नाहीं. सोडचिट्टी नक्की झाल्यावर पुढे चार महिने लोटेपर्यंत सोडलेल्या बायकोस इतर पुरुषाबरोबर लग्न करितां येत नाहीं. ह्या मुदतींत बायको परीक्षेवर आहे असे ह्मणण्याचा प्रघात आहे. नव-याने सोडलेली बायको ज्या मुदतीपर्यंत परीक्षेवर असेल ती मुदत संपे तोंपर्यंत पोटगी व राहण्यास जागा ह्यांविषयीं तिचा हक्क तिच्या नव-यावर असतो. जेव्हा काडी मोडण्याची गोष्ट नव-यापासून उद्भवते, तेव्हा लग्नाच्या वेळीं नव-याने में कांहीं तिला द्यायाचे कबूल केले असेल, ते सर्व त्याने तिला दिले पाहिजे. बायको आपल्या नव-याच्या संमतीने त्याचेपासून आपली लग्नाचे संबंधांतून सुटका खरीद करून घेण्यास मुखत्यार आहे. नवरा नपुंसक असल्याचे शाबिद झाल्यास बायकोस नव-या- पासून सुटका करून घेण्याची मुभा आहे. बायको न सोडून देण्याविषयीं व होईल तर परस्परांचे सख्य राखण्याविषयी