पान:महमद पैगंबर.djvu/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोटी कल्पना व तिचे खंडण was broken by the Maharattas. The Power of the Maharattas was broken by the Afgans and while all were struggling against all, the Britain rushed in and w3s enabled to subdue them all.* (बड्या मोगल बादशाहांची सार्वभौम सत्ता त्यांच्याच सुभेदारांनीं खिळखिळी केली. मराठ्यांनी या सुभेदारांना नरम केले आणि अफगाणांनी मराठ्यांच्या सत्तेवर आघात केला. अशा रीतीने सर्वच जण इतर सर्वांशी झगडत असतांना, ब्रिटिश लोक आंत घुसले आणि त्या सर्वानाच जिंकणे त्यांना शक्य झाले.) माक्र्सला १८५३ सालीं कळलेली ही गोष्ट Confederacy of India या पुस्तकाचा लेखक A Punjabi याला १९३८ सालींहि कळली नाहीं. कारण आपल्या अद्भुत पुस्तकाच्या पृ० १३८ वर त्याने पुढील तारे तोडून छेविले आहेतः । As the English had won their Empire from the Muslims, they trusted the Hindus in preference to them ! (इंग्रजांनी साम्राज्य मिळविलें तें मुसलमानांना जिंकून मिळविलें! म्हणून इंग्रज मुसलमानांच्या मानाने हिंदूवर अधिक विश्वास ठेवू लागले ! ) इंग्रज भरतखंडाच्या साम्राज्यसत्तेचे स्वामी झाले ते कसे इतकाच प्रश्न सूर्त विचारांत घ्यावयाचा असल्यामुळे, सोळाव्या शतकांत व तत्पूर्वी पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या बुभुक्षितांनी हिंदुस्थानांत कोणकोणत्या कलागती केल्या या मुद्याकडे वळण्याचे कारण नाहीं. बाबरापासून सुरू झालेल्या मोगल घराण्याच्या अंमलापूर्वी जवळ जवळ तीनचारशे वर्षे मुसलमानांच्या टोळधाडी हिंदुस्थानाला उपद्रव देऊ लागल्या होत्या. हे खरे असले तरी, हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशाची एकमुखी सत्ता मुसलमानांच्या हातांत त्या समयाला तरी गेली नव्हती, हे सुस्पष्ट आहे. चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत काश्मीरांत सेनदेव राजा राज्य करीत होता. सेनदेवाच्या मृत्यूनंतर, त्याचा मुसलमान प्रधान शहा मीर याने काश्मीरचे राज्य बळकाविले हे खरें; पण आपलें मुसलमानपण हिंदुप्रजेला तापदायक होऊ नये याबद्दल त्याला फार दक्षता बाळगावी लागत होती. राजस्थानातील राणी संग, उदयसिंह,

  • Karl Mar, Letters on India, p. 55.