पान:महमद पैगंबर.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ पाकिस्तानचे संकट महिन्यांत मुंबईच्या विविधवृत्त' साप्ताहिकांत एक लेखमाला लिहिली होती. या लेखमालेतल्या तिस-या लेखांत डॉ० परांजपे यांनी पुढील असंदिग्ध विधाने केली आहेत : (१) हिंदुस्थानच्या राजकारणांत ब्रिटिशांचा शिरकाव होऊ शकलो नसता तर, हिंदुपदपातशाहीचाच अंमल सान्या हिंदुस्थानांत परत गाजूं लागला असता, यांत संदेह नाहीं. (२) ब्रिटिश अमदानीपूर्वी आम्ही हिंदुस्थानचे राज्यकर्ते होतों; सबब आम्हांला जादा हक्क मिळाले पाहिजेत हें बुसलमानांचे म्हणणे इतिहासाचा सरळ दाखला देऊन खोडून काढता येईल. ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकून घेतला तो मुसलमान राज्यकर्त्यांपासून नव्हे तर, मराठे, शीख यांजकडन होय. 'संस्कृति संगम' या विद्वत्ताप्रचर ग्रंथांत सर्व गोष्टींचे समतोलबुद्धीने विवेचन करणारे प्राध्यापक द० के० केळकर यांनींहि पृ० २७९ वर अशाच त-हेचा निष्कर्ष काढिलेला आहे* भारताची सार्वभौम सत्ता इंग्रजांच्या हाती आली ती मोगल बादशाहांच्या हातांतून निखळून आली नाहीं हें १८५३सालांत शेंकड़ों मैल अंतरावरून हिंदुस्थानाकडे पाहणा-या कार्ल मार्क्सलाहि चांगले कळले होते. २२ जुलै १८५३ रोजी अमेरिकन वाचकांसाठी लिहिलेल्या व ‘न्यू यॉर्क डेली टाइम्स'च्या ८ ऑगस्ट १८५३ च्या अंकांत प्रसिद्ध झालेल्या 'The Future Results of British Rule in India या लेखाच्या आरंभींच माक्र्सने How cane it that English supremacy was established on India ? (हिंदुस्थानांत इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले ते कसे ?) असा प्रश्न उपस्थित केला असून त्याचे उत्तर पुढील प्रमाणे दिले आहे. । The Paramount Power of the Great Moghul was broken by the Moghul Viceroys. The power of the Viceroys | *रजपुतांनंतर सतराव्याअठराव्या शतकांत मराठ्यांनीं पुनश्च नेटाचा प्रयत्न केला व मुसलमानी अंमल बहुतेक झुगारूनहि दिला. आणि हा लढा मराठे व मोंगल यांमध्येच राहता तर कदाचित् मराठ्यांचे साम्राज्य अखिल भरतखंडभर पसरले असते. पण ही क्रिया अर्धीमुर्धी होते न होते तोंच त्यांची अशा जबरदस्त शत्रूशीं गांठ पडली की, त्याच्यापुढे मराठे शतक अर्धा शतकहि टिकाव धरू शकले नाहीत. पौर्णिमेच्या रात्री चंद्रबिंब क्षितिजावर मिरवू लागते न लागते तोंच त्याचा खग्रास व्हावा, असा प्रकार झाला.