पान:महमद पैगंबर.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ पाकिस्तानचे संकट प्रतापसिंह इत्यादींनीं इब्राहिम लोदीपासून अकबरापर्यंतच्या काळांत आपला स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रेमी बाणा नेटाने व थाटाने कसा कायम टिकविला होता याची साक्ष खुद्द इंग्रज इतिहासकारांनीच दिली आहे. चंदेरीचा राजा मेदिनीराय हाच सोळाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत राणा संगाचा प्रतिनिधि म्हणून माळव्याचा कारभार पाहात असे. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत म्हणजे तेराव्या व चौदाव्या शतकाच्या संधिकालापर्यंत गुजराथमध्ये हिंदुराजसत्ता नांदत होती. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी मलिक काफूरने देवगिरी, तेलंगण इत्यादि राज्ये पादाक्रांत करीत द्वारसमुद्र गांठलें हें खरें असले तरी, या आक्रमणाची पाठ वळतांच दक्षिण भारतांत हिंदुसत्ता फिरून स्थिरस्थावर झाली. विजयानगरचे वैभवशाली हिंदुराज्य १५६५ पर्यंत जोरांत होते. बंगाल-बिहार-भागांत मुसलमानी सुलतानांची सत्ता पुष्कळच लौकर स्थापित झाली हे खरे; पण या दोन्ही विभागांत हिंदु जमीनदार फार प्रबळ होते व कोणतीहि राज्यसत्ता असली तरी तिच्यावर य सत्तेचे दडपण ब-याच मोठ्या प्रमाणांत असे, ही गोष्ट विसरण्याजोगी नाहीं. | हिंदुस्थानची साम्राज्यसत्ता मोगल घराण्याच्या हातीं येण्यापूर्वीचा दोन तीनशे वर्षांचा काळ स्थूल मानाने दृष्टीसमोर आणला तर त्या काळांत हिंदुस्थानांत मुसलमानांच्या हातीं फारशी राजसत्ता होती, असे न्यायाने म्हणतां यावयाचें नाहीं. दिल्ली जिंकून बाबराने मोगली राज्यसत्तेची मुहूर्तमेढ रोविली हे खरे. पण, त्याच्या अल्पकालीन कारभारानंतर त्याचा मुलगा हुमायून याला राज्याला मुकावे लागले व जवळ जवळ सारा जन्म त्याला वनवासांत काढावा लागला हे ऐतिहासिक सत्य आहे. इ०स० १५५६ मध्ये पानिपतची लढाई जिंकून अकबर दिल्लीपति झाला, त्या वेळी व त्यानंतर कांहीं वर्षे त्याची सत्ता दिल्लीभोंवतालच्या फार मर्यादित मुलुखावर चालत असे. अकबरालाहि क्रूरपणाचे झटके येत असत, नाहीं असें नाहीं; पण, राज्यसंपादनाचा व राजवैभव भोगण्याचा आपला उद्योग सफल व्हावयाचा असेल तर, हिंदुस्थानच्या विशिष्ट परिस्थितींत, मुसलमानपण जवळजवळ गुंडाळूनच ठेवून चालले पाहिजे हे धोरणी शहाणपण शिकून अकबर वागू ‘लागला.