पान:महमद पैगंबर.djvu/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५४ ] त्यांत त्याने असे सांगितले आहे की, परमेश्वराची आज्ञा अशी आली आहे की, जातीजातींतले परस्परांमधील कलह यापुढे बंद झाले पाहिजेत; प्रत्येक माणसास चारच बायका करण्याची मुभा आहे. परमेश्वराचा चारच बायका करण्याविषयींचा आदेश पैगंबर मदीनेस गेल्यावर पुष्कळ दिवसांनी मिळाला. ह्याची अकरा लग्ने अवल होऊन गेली होती. इतर लोकांस आपल्या बायकांस सोडचिट्टी देण्याचा जसा अधिकार होता, तसा पैगंबरास नव्हता. त्याला आपल्या बायका सोडून देण्याची मनाई होती, व जास्त लग्ने करण्याचीहि मनाई झाली होती. या प्रकरणांत जे कित्येक लोक त्याला दोष लावितात तो व्यर्थ आहे. काडी मोडून देण्याविषयी जे कुरानांत नियम सांगितले आहेत त्यांविषयी पुष्कळ गैरसमजूत आहे. पूर्वी अरब लोकांत सोडचिट्टी देण्याचा अधिकार केवळ नव-यालाच असे; आणि त्याबद्दल त्याला कोणतेहि बंधन नसे. बायकांबरोबर दयाळूपणाने व रास्तपणाने वागले पाहिजे असे अरबी लोकांस मुळीच वाटत नसे. सोडचिठ्ठी देण्याची चाल पैगंबरास मुळीच आवडत नसे. तो वारंवार ह्मणे कीं, दास मुक्त केल्याने परमेश्वरास फार आनंद होतो; परंतु बायकोला काडी मोडून दिल्याने परमेश्वर अत्यंत कोपायमान होतो. त्याने जे या प्रकरणी नियम लावून दिले आहेत, ते ध्यानात ठेवण्या