पान:महमद पैगंबर.djvu/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५३ ] लिक टोळीचे लोक आतां पैगंबराच्या गोतांतले झाले आहेत; आपणहि त्यांच्याशी सलोख्याने वागले पाहिजे. सर्वांचा असा विचार झाल्यावर प्रत्येक शिपायाने आपापल्या अटकेतील माणसे बंधमुक्त केली. या मुळे १०० कुटुंबांस स्वातंत्र्य मिळून सर्व लोकांनी जुवारियाबाई व महमद या दोघां स्त्रीपुरुषांवर परमेश्वराचा पूर्ण आशीर्वाद नांदो, असा परमेश्वराजवळ दुवा मागितला. सफीयावाई या नावाची एक यहुदीण होती, तिचे लग्न पैगंबराबरोबर झाले. याची हकीगत वरील गोष्टीप्रमाणेच आहे. हा दहावा विवाहसंबंध: मैमुनाबाई इजबरोबर महमदानें मक्केस लग्न लाविलें; ही बाई त्याच्या नात्यांतील होती. लग्न झालें त्या वेळी तिचे वय ६० वर्षांचे होते. ह्या लग्नामुळे त्या बाईस एक आधार झाला व त्या बाईचे आप्तांतले दोन रणशूर पुरुष येऊन इस्लामास मिळाले. एकाचे नांव इब्न-आबास व दुसव्याचे नांव खालीद-इब्न-वलीद. हाच ओहद येथील लढाईत महमदाच्या शत्रूच्या घोडेस्वारांचा अधिपति होता. इस्लामाची दीक्षा घेतल्यावर यानेच पुढे हेलेणी लोकांस जिंकून पादाक्रांत केले. हा अकरावा विवाहसंबंध. ही पैगंबराच्या लग्नांची हकीकत झाली. ह्या लग्नांमुळे त्याने अरबस्थानांतील कुटुंबांचे जे परस्पर तंटे चालले होते ते पुष्कळ नाहीसे केले. पुढे पुष्कळ वर्षे लोटल्यावर अफत पर्वतावर महमदाने जो उपदेश केला