पान:महमद पैगंबर.djvu/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५२ ] त्यानेच या दोघां भिन्न स्वभावांच्या मनुष्यांत विवाहसंबंध जोडला होता. झैनाबवाईस सोडचिट्टी मिळाल्यानंतर माझ्याबरोबर लग्न कर ह्मणून ती महमदाचे मागे लागली; आणि त्याची बायको झाली तेव्हांच तिने त्याचा पिच्छा सोडला. पैगंबराचा हा आठवा विवाहसंबंध. । । जुवारियावाई ही महंमदाची नववी बायको. हारिस या नांवाचा कोणीएक गृहस्थ बनी-मुस्तालिक नांवाच्या जातीचा अधिकारी होता. ही वाई त्याची कन्या होती. वनी-मुस्तालिक टोळीचा पराभव करण्याच्या उद्देशाने मुसलमानांनीं एक स्वारी केली होती. त्यांत एका मुसलमानाने जुवारियाबाईस हस्तगत करून घेऊन आपल्या अटकेत ठेविलें. अटकेत असतां अटकेत ठेवणाराबरोबर तिने अशी कबूली करून घेतली होती की अमुक एक पैशाची रकम मी तुला देऊन आपली सुटका करून घेईन. तिने पैगंबराजवळ या रकमेची मागणी केली. ती त्याने तत्क्षणीच देऊन तिची सुटका केली. पैगंबराचा हा आपल्यावरती मोठा उपकार झाला ह्मणून कृतज्ञ बुद्धीने तिने पैगंबरास असे ह्मटलें कीं, मला आपली स्त्री कर ह्मणजे तुझे मजवर उपकार होतील. पैगंबराने तिच्या बोलण्यास मान देऊन तिजबरोबर लग्न लाविलें. ही गोष्ट सर्वत्र जाहीर होताच मुसलमानांनीं आपसांत असा विचार केला कीं, वनी-मुस्ता