पान:महमद पैगंबर.djvu/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५१ ] उत्पन्न झाला असेल. एके प्रसंगी पैगंबर ह्या दोघां नवराबायकोस भेटावयास गेला होता. त्या वेळीं, झैनाबबाईच्या तोंडावर बुरखा नव्हता. जसे एखादें सुंदर चित्र पाहिले ह्मणजे आनंद होतो, तसे तिचें तें सुंदर रूप पाहून पैगंबराला मोठा आनंद झाला व त्याच्या मुखांतून असे उद्गार निघाले की, “अंतःकरणाचा धनी जो परमेश्वर त्याचे नाम सुवंदित असो." आश्चर्याच्या भरात असतांना जे हे निघालेले शब्द त्यांचा ह्या बाईने वारंवार उच्चार करून आपल्या नव-याचे अंतःकरणांत आपल्याविषयी तिटकारा उत्पन्न केला. शेवटीं होता होतां झैद याने असा निश्चय केला की आपण आपल्या बायकोचा त्याग करावा. ही गोष्ट कळविण्यासाठीं तो पैगंबराकडे गेला. पैगंबराने त्याला विचारले की, तिच्या हातून कांहीं अपराध घडला काय ? झैद ह्मणाला नाहीं; पण यापुढे तिचा समागम मला नको. तिने माझ्या जवळ राहू नये. नंतर पैगंबराने त्यास निक्षून सांगितले ते असे. “जा येथून आणि आपल्या बायकोला जप. परमेश्वराला भिऊन तिला चांगल्या प्रकारे वागीव. कारण परमेश्वराचे असे वचन आहे की, आपल्या बायकांचा सांभाळ करा; आणि परमेश्वराचे भय बाळगा." पैगंबराच्या या सांगण्याने झैद याच्या मनाचा पालट न होता त्याने आपल्या बायकोला सोडचिट्टी दिली. यावरून पैगंबरास दुःख झाले. कारण