पान:महमद पैगंबर.djvu/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २५० ] गेला. मुलीचे लग्न होत नाहीं ही अपमानाची गोष्ट आहे असे त्यास वाटे. हा माझा अपमान कसा दूर होईल याविषयी प्रश्न पैगंबरापुढे उमर याने केला. हा उमराचा अपमान दूर झाला पाहिजेच व उसमान व अबूबकर तर लग्न करण्यास नाकारतात, तेव्हां पैगंबराने स्वतःच हफसावाईबरोबर लग्न केलें; आणि उमर लांछन दूर केले. ह्यामुळे दोष तर कोणीं ठेवला नाहींच, परंतु सर्व लोकांस समाधान वाटलें. हा पैगंबराचा चौथा विवाहसंबंध होय. हिंन्द-उम्मे-सल्मा ही पांचवी बायको. उम्म-हबीबा ही सहावी बायको. झैनाब ही सातवी बायको; हिला उम्मेमिसकीन ह्मणजे गरीबांची माय असे ह्मणत. या बायांस आश्रय देण्यास कोणी राहिला नव्हता; ह्मणूनच पैगंबराने त्यांच्या बरोबर लग्ने लाविलीं, व त्यांचा प्रतिपाळ केला. झैद याची हकीगत मार्गे सांगितलीच आहे. झैनाब नांवाची त्याची बायको अरबस्थानांतील फार मोठ्या घराण्यांतील बाई होती. आपल्या मोठ्या कुळाचा व शिवाय आपल्या सौंदर्याचा अभिमान तिला फार होता. त्यामुळे बंधमुक्त झालेल्या मनुष्याबरोबर आपली जन्माची गांठ पडलेली पाहून तिच्या जिवाला जाचत असे. सरते शेवटीं परस्पर नवराबायकोमध्यें बेबनाव झाला. तिच्या बोलण्यावरूनच कदाचित् नवयाचे मनांत तिजविषयीं तिटकारा