पान:महमद पैगंबर.djvu/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| [ २४७ ] नाहीं तर तुह्मी एकाच बायकोबरोबर लग्न करा, अधिक बायकांबरोबर करू नका. अनेक बायकांस सारखेपणाने वागविणे ही गोष्ट शक्यच नाहीं. ह्मणून इस्लामी पंडितांचे ह्मणणे असे पडतें कीं, एकाच बायकोबरोबर लग्न करणे प्रशस्त व कुरानाचे शिकविणेहि तसेच आहे. पैगंबराच्या फातमावाई नांवाच्या मुलीविषयी त्याच्या शिष्यांची फारच भक्ति व प्रेम असे. ते तिला स्वर्गीय स्त्रीरत्न असें ह्मणत. परमेश्वराने स्त्रीजातीमध्ये जितके गुण ठेविले आहेत, ते समुच्चयेंकरून या बाईच्या अंगीं वसत असत. शुद्धता व पवित्रता यांचे ती माहेरघर असल्यामुळे ती सर्व स्त्रीजातीमध्ये श्रेष्ठ मानली होती. पैगंबराचे लग्नांविषयी लोकांत बराच मोठा गैरसमज आहे. त्याचा खरा वृत्तांत समजल्यास हा खोटा समज दूर होईल. ऐन तारुण्याचे भरांत ह्मणजे पैगंबर २९ वर्षांचा असता त्याने खदीजाबाई बरोबर लग्न लाविले. त्या वेळी ती पैगंबरापेक्षा वयाने बरीच वडील होती. खदीजाबाईचे महमदाशी लग्न झाल्यावर ती २५ वर्षांनी मरण पावली. ही २५ वर्षे दोघांची मोठी आनंदाचीं गेलीं. पैगंबराचा मूर्तिपूजक लोकांनी बहुत प्रकारे छळ करावा; परंतु अशा प्रसंगीं खदीजाबाई त्याचे शांतवन करीत असे. खदीजाबाईच्या मरणसमयीं पैगंबराची उमर ५० वर्षांची होती. ह्या २५ वर्षांचे काळांत