पान:महमद पैगंबर.djvu/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २४८ ] देशरिवाजाप्रमाणे दुसन्या अनेक बायका करण्याची पैगंबराला मुभा होती तरी त्याने दुसरे लग्न केलें नाहीं. पैगंबराचा सक्रन नांवाचा एक आवडता शिष्य होता,तो आपल्या बायकोला घेऊन पैगंबराच्या आज्ञेप्रमाणे हवसाण प्रांतीं गेला होता; तेथे तो मरण पावला. तेथून त्याची बायको सौदाबाई ही नवरा मेल्यानंतर सर्व प्रकारे निराश्रित होऊन मक्केस परत आली. विधवाबाईस आपल्या घरी ठेवून आश्रय देणे देशरिवाजाप्रमाणे प्रशस्त नाहीं ह्मणून तिनबरोबर लग्न केले तर त्यांत कांहीं वावगी गोष्ट धरली जाणार नाहीं; व निराश्रित विधवाबाईस आश्रय देता येईल, असे समजून पैगंबराने सौदाबाईबरोबर लग्न लाविलें. तिच्या नव-याने धर्मासाठी देशत्याग केला होता, व पुष्कळ त्रास सोशिला होता. अशा शिष्याच्या बायकोस निराश्रित ठेवणे ह्मणजे अयोग्य. लग्न केल्याशिवाय आश्रय देण्यास दुसरा मार्ग नव्हता, असे पाहून पैगंबराने हे लग्न लावून घेतले. पैगंबराचा हा दुसरा विवाह संबंध. अबूबकर या नांवाचा पैगंबराचा एक सुप्रसिद्ध भक्त होता; त्याचे पैगंबरावर फारच प्रेम असे. त्याला आयशा नांवाची एक अति रूपवान मुलगी होती. तिचे पैगंबराबरोबर लग्न करून द्यावे अशी अबूबकराच्या मनाची फारच उत्कट इच्छा होती. ज्याने आपणास अज्ञानांतून बाहेर काढलें, व