पान:महमद पैगंबर.djvu/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २४६ ] ती आपल्या बापाच्या घरीं असेल तेव्हा त्याची जायदाद; व नव-याचे घरी गेली ह्मणजे त्याची जायदाद. नवरा मयत झाल्यावर त्याच्या विधवा त्याचे मुलगे असतील त्यांच्या वाट्यास इतर मालमत्तेप्रमाणे जात आणि ह्मणूनच सापत्न मुलांचे आपल्या सापत्न आईंबरोवर व सापत्न जामातांचे सापत्न सासवांबरोबर वारंवार विवाह-संबंध जडत असत. एकाच वेळी अनेक नवरे करण्याची चाल सुद्धा यमन प्रांतांत ब-याच ठिकाण चालू होती. तेव्हां पैगंबराने मुख्य गोष्ट ही सांगितली कीं, बायकांविषयीं पूज्यबुद्धि ठेविली पाहिजे; व त्यांस आदराने वागविले पाहिजे. पैगंबराने करारी लझे बंद केली. त्याकालापर्यंत बायकांस जे हक्क नव्हते, ते हक्क पैगंबराने त्यांस दिले. धर्मशास्त्राचे संबंधाने पुरुषांचे हक्क व बायकांचे हक्क सारखेच हे त्याने स्थापित केले. एकाच समय लग्नाच्या किती किती बायका असाव्या याविषयी त्याने नियम घातल्यामुळे व नव-याने आपल्या सर्व बायकांबरोबर सारखेपणाने वागावे असाहि निबंध घातल्यामुळे अनेक बायकांबरोबर लग्न करण्याच्या चालीस त्याने बरेच मोठे अडकण घातले. याविषयी कुरानांत अशी आज्ञा आहे की, वाटेल तर तुह्मी दोघी, तिघी, अथवा चवघी बायकांबरोबर लग्न करा; पण याहून अधिक बायका करू नका. जर तुह्मांस सर्वांशीं सारखेपणाने व समचित्त भावाने व यथान्याय वागतां येणार