पान:महमद पैगंबर.djvu/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २४५ ] अध्याय १३ वा इस्लामी स्त्रियांची स्थिति. * मातुःश्रीच्या चरणांसमीप मोक्षधाम आहे. " इस्लाम धर्माची स्थापना होण्यापूर्वी अरबस्थानांतील लोकस्थिति जी होती. तीस अज्ञानावस्था ' असे ह्मणण्याचा प्रघात आहे. ह्या अज्ञानावस्थेच्या काळांत अरब देशांत स्त्रियांच्या संबंधाने लोकांचे विचार फारच अप्रशस्त असत. स्त्रियांशी पुरुषांची वागणूक अश्लाघ्य प्रकारची असे. हे अरब लोक आपल्या मुलींनां जितेपणींच पुरून टाकीत. ही जीवंतपणीं पुरण्याची दुष्ट चाल पैगंबराने आपल्या उपदेशाने अगदीं मोडून टाकली. तसेच देवतांनां मुळे बळी देण्याची क्रूर चाल अरबस्थानांत जारी होती, तीहि पैगंबराने नाहींशी केली. एका पुरुषाने पुष्कळ बायका करण्याची चाल फार प्राचीन काळापासून सर्व पृथ्वीवर चालत आलेली आहे. देशोदेशीं या चालींत चांगले वाईट फरक दृष्टोत्पत्तीस येतात. अरब लोकांत ही चाल होतीच व याशिवाय असाहि प्रघात होता की, कांहीं कांहीं लग्ने तर नियमित अवधीच्या कराराची असत. ही कराराची वेळ संपली की, लग्नसंबंध आपोआप तुटून जाई. त्यामुळे नवराबायकोचे परस्परांवर प्रेम राहत नसे. अरबी लोकांत अशी समज असे की, बायको झणजे एका प्रकारची चीजवस्त;