पान:महमद पैगंबर.djvu/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोटी कल्पना व तिचे खंडण बधी बिघडल्यामुळे, त्या शरीरावर एखादें इस्लामी गळू उमटलें अगर या शरीरांतल्या बुद्धीचे डोळे मंद झाल्यामुळे, किंचित् कालपावेतों त्याला पक्षाघाताचा झटका आला म्हणून तेवढ्याने कांहीं त्या शरीराचे हिंदुपण नाहीसे होत नाहीं ! इस्लामी गळू झाले हे लक्षांत येण्याला थोडा विलंब लागला; पण ती गोष्ट लक्षांत येतांच, बायोपचार व अंतर्गत उपचार यांचा मारा करून या हिंदुशरीराला प्रायः रोगमुक्त करण्यांत आलेच ! ही मुक्तता पुरी होण्यापूर्वीच पक्षाघाताचा झटका आला हा योगायोग ! त्या रोगांतून व या झटक्यांतून एकदमच कसे मुक्त व्हावे या प्रश्नाच्या विवंचनेत हिंदू समाजाचे शरीर व मन आज गुरफटून गेले आहे. इंग्रजांची सत्ता हिंदूंनी निमूटपणे, अविरोधवृत्तीने मान्य केली हे म्हणणे जसे खोटें तसेच मोगली साम्राज्यसत्ता हिंदूंनी मान्य केली व चालू दिली हे म्हणणेहि मुळांतच खोटें ! इंग्रजांची साम्राज्यसत्ता मोगली साम्राज्यसत्तेची वारसदार ही कल्पना तर त्याहूनही खोटी ! अशा खोट्या कल्पनांवर व प्रमाणांवर आधारलेली पाकिस्तानची कल्पना कोणत्या मनोवृत्तींतून स्रवली असेल, हे सहज समजण्यासारखे आहे. इंग्रजांपूर्वी भारताचे शास्ते मोगल म्हणजे मुसलमान होते ही समजूत साफ खोटी असल्याचे डॉ० र० पु० परांजपे यांच्यासारख्या समतोलबुद्धीच्या नेमस्ताग्रणीने स्पष्ट शब्दांत बजावलें आहे, ही गोष्ट या विवेचनाच्या दृष्टीने फार उपकारक झाली आहे. निराशाग्रस्त झालेल्या बॅ० जीनांनी हल्ली काँग्रेसमधल्या हिंदूंना ‘हिंदु' म्हणून हिणवण्याला सुरुवात केली आहे. बॅ० जीना हे डॉ० परांजपे यांच्यासारख्या विद्वानालाहि हिंदु म्हणून हिणविण्याला कदाचित चुकणार नाहींत. पुरुष ग बाई पुरुष' म्हणून बोटे मोडणा-या आततायी स्त्रियांच्या टीकास्त्रांतून स्त्रीदाक्षिण्याचा मूर्तिमंत पुतळाहि शीरसलामत सुटणे जसे शक्य नसते त्याप्रमाणेच, कोणताहि विचारशील हिंदु बॅ० जीनांच्या टीकास्त्रांतून सुटणे सध्या तरी शक्य नाहीं. बॅ० जीनांनी सपू परिषदेनंतर जी मुक्ताफळे उधळलीं त्यांमुळे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. पण, जीना कांहींहि म्हणाले तरी, निवकार मनाचा विचार म्हणून डॉ० परांजपे यांचे म्हणणे महत्त्वाचे आहेच आहे. डॉ० आंबेडकर यांच्या पाकिस्तानविषयक ग्रंथावर टीका म्हणून डॉ० परांजपे यांनी गेल्या एप्रिल-मे