पान:महमद पैगंबर.djvu/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० पाकिरतानचे संकट वरचा हिंदुसमाज कांहींसा बदलला अगर बावरला असला तरी खालचा समाज अद्यापि बदलला नाहीं हे सत्य आहे; आणि, हिंदुसंघटनेचे कार्य यशस्वी होईल हे भविष्य आशावादीपणाने वर्तविण्याला जे आधार आहेत त्यांत बहुसंख्य हिंदुसमाजांत अद्यापहि टिकून असलेले हिंदुत्वप्रेम हा एक महत्त्वाचा आधार होय ! योग्य वृत्तीने प्रेरित झालेले हिंदुसंघटनवादी कार्यकर्ते समाजसंघटनेचे कार्य करू लागतील तर, हिंदुमहासभा ही ब्राह्मणांची सभा आहे हा खराखोटा आक्षेप सांदीकोपयांत दडून बसेल. हिंदुमहासभा ब्राह्मणांची कां असावी ? तिला शिंपी पाहिजेत, तिला चांभार पाहिजेत, तिला कुंभार पाहिजेत, तिला अठरा पगड हिंदु जात सगळीच्या सगळी पाहिजेच आहे ! रुद्रसूक्त रचणा-या द्रष्ट्या ऋषीने समाजाचे विश्वात्मक स्वरूप नजरेसमोर ठेविलें आहे आणि कसलाहि सानथोर व्यवसाय करणारा मनुष्य हा ईश्वरस्वरूपीच आहे असे मानून, त्याने प्रत्येक व्यवसायांत गढून गेलेल्या माणसाला नम्रपणाने नमस्कार केलेला आहे. 'नम इषुकृभ्यो धन्वकृद् भ्यश्च वो नमो नमः' असे म्हणणा-या या ऋषिश्रेष्ठाने कुलाल, कर्मार, चर्मकार, श्वपति अशा सर्वांना सारख्याच भक्तिभावाने नमस्कार केलेला आहे. अशाच भक्तिभावाने हिंदुसंघटनावादी कार्यकर्ते कामाला लागतील तर, उद्यांच्या हिंदु सभेत नामदेवासारखे शिंपी, गोरोबासारखे कुंभार, सेना न्हाव्यासारखे कारागीर, रोहिदासासारखे चांभार असे सर्व एकमेळाने नांदू लागतील. अशा सगळ्यांचीच हिंदुमहासभेला आणि हिंदुसंघटनेच्या कार्याला सदैव गरज राहील. । ३६६६६६६६६६६६६३ ३ शिवणकला शिक्षक (लेखक–आर्. एन्. पराडकर, लंडन डिप्लोमा-होल्डर) शिवणकलेचे, सर्व त-हेच्या कपड्यांचे संपूर्ण माहितीचे ५०० पृष्ठांचे व ५०० आकृत्यांचे पुस्तक भाग १-२-३. एकत्र किंमत • ६ रु. व्ही. पी.ने ६-८-० अगदी नवीन शिकणारापासून तों तज्ज्ञ है शिप्यापर्यंत उपयुक्त आहे. पराडकर टेलरिंग अॅकॅडेमी, ६७२ सदाशिव, पुणे २. GES६: :::::::::::C23999999993 2 ६६६६६६६६६६६६