पान:महमद पैगंबर.djvu/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुसंघटनेचा महामंत्र २३१ दैन्यामुळे व दारिद्रयामुळे हिंदुसमाजाला रकटीं पांघरावी लागतात. त्यामुळे त्याचे बारीक सारीकहि दोष मिस् मेयोसारख्या गटारइन्स्पेक्ट्रेस' कंडून भडक रंगांत जगाच्या चावडीवर मांडले जातात. हिंदुसमाजाच्या अंगावर आज जी रकटीं आहेत तीं नामदेव महाराजांसारख्या शिंप्यांकडून व्यवस्थितपणे शिवली गेली तर हिंदुसमाजांतील दोषांचे हे ओंगळ प्रदर्शन टळणार नाही का? मोठी संघटना म्हटली म्हणजे त्या संघटनेत कच्चींपक्की मडकीं एकमेळाने नांदावयाचीच ! कच्च्या मडक्यांचा आवाज नेमका लोकांच्या कानावर घालून त्यांना त्यांचे योग्य स्थान दाखविण्यासाठी गोरोबा कुंभारांचीहि हिंदूसंघटन कार्याला जरुरी आहे. हिंदुसंघटनाबादी कार्यकत्र्यांनी आपली मने कितीहि निर्मळ बनविली तरी, कित्येकांच्या डोक्यांतला कुकल्पनांचा मळ एकदमच निघून जाईल असे नाहीं. हा मळ काढून टाकण्यासाठीं सेनोबासारख्या कारागिरांची आवश्यकता हिंदुसंघटनाकार्यात आहेच आहे. हिंदुसंघटनेचे अवाढव्य कार्य करतांना ज्यांना आपल्या शरीरावरच्या कातड्याचे जोडे फाडावे लागतील त्यांचे क्लेश कांहीं अंशीं तरी कमी व्हावे म्हणून, त्यांना पादत्राणे पुरविण्यासाठी आणि हिंदुसंघटनेच्या कार्यावर कुत्सितपणाने आक्षेप घेणारांना मोजून पैजारा मारण्यासाठीं रोहिदास बाबांचीहि गरज आहेच आहे. हे सर्व थर हिंदुसंघटनाकार्यात अवश्य सामील होतील आणि एकसंध झालेला प्रचंड हिंदु समाज कोटिकोटि कंठांतून धन्योद्गार काढू लागेल, असे मनोहर दृश्य एखाद्या हिंदूने आजच कल्पनेने पाहिले तर ते खास चुकीचे ठरणार नाहीं ! कारण, हिंदुसंघटनेच्या कार्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास बाळगण्याला अत्यंत अनुकूल असा कोणता काल असेल तर तो सध्यांचाच काल आहे. चालू युद्धानंतर जगाचे रंगरूप कसे व किती पालटते हे ठरविण्याचे मोठेसे सामर्थ्य सध्यां आपल्या ठिकाणीं नाहीं. आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणीं हें सामर्थ्य निर्माण करून ठेविले असते तर, ब्रिटिश साम्राज्यावर ओढवलेल्या सध्यांच्या प्रसंगांत आपण केवढी तरी कामगिरी करून दाखविली असती व मारितां मारितां घ्यावे,राज्य आपुलें' हा श्रीसमर्थाची