पान:महमद पैगंबर.djvu/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०९ काँग्रेसच्या राजकारणाची इतिश्री समाजाच्या न्याय्य हितसंबंधांच्या दृष्टीने स्वीकार्य नाहीं असे ठरले तर, जगाच्या चावडीवर हिंदुस्थानांतल्या लोकांमधील बेबनावाचे नमुनेदार प्रदर्शन होणार; दुसरा तर कांहीं फायदा यांत दिसत नाहीं ! मुसलमानांनी आपल्या हितरक्षणासाठी काय अवश्य आहे हे जर स्वतंत्र रीत्या ठरवावयाचे तर, मुसलमानांनी मागितलेल्या गोष्टी देणे हिंदु समाजाला । परवडेल की काय हे हिंदु प्रतिनिधींना हिंदु या नात्याने स्वतंत्रपणे ठरविण्याचा अधिकार ओघानेच मिळाला पाहिजे. हा अधिकार हिंदू म्हणून गाजवावयाचा असल्यामुळे, हिंदुसभेच्या सभासदांखेरीज इतर कोणालाहि या प्रतिनिधित्वावर हक्क सांगण्याची शक्यता उरता कामा नये. .' असे अनेक भानगडीचे प्रश्न या घटनासमितीच्या कल्पनेच्या पोटांत दडून बसलेले आहेत. त्यांची उत्तरें मात्र डॉ०राजेन्द्र प्रसाद, मौलाना अझाद प्रभृति, कोणीच काँग्रेसधुरीण देऊ धजत नाहींत ! मुसलमानांची मागणी किती अविवेकी असू शकेल याची कल्पना कांहीं मुसलमान पुढा-यांच्या पूर्वीच्या उद्गारांवरून करता येण्यासारखी आहे. अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या हिंदूंची हिंदु व मुसलमान या दोन समाजांनीं निम्मेनिम वांटणी करून घ्यावी ही धिटाईची कल्पना कोकोनाडा काँग्रेसचे अध्यक्ष पैगंबरवासी मौलाना महंमदअल्ली यांनी भरल्या तोंडी मांडलीच होती कीं नाहीं ? जिवंत माणसांचा समाज-त्या समाजाची इच्छा असो वा नसो-वांटून घेण्याची कल्पना बोलण्याला ज्या समाजांतील थोरामोठ्यांना मनाची काडीमात्र खंत वाटत. नाहीं त्या समाजांतील प्रतिनिधि देशाची वाटणी करण्याबद्दल आग्रह धरणार , नाहीत, असे तरी कां मानावयाचें ? मुसलमान समाजांतील सध्यांचा एकंदर सुर पाहिला तर असेच मानावें लागतें कीं, देशाची खांडोळीं करा आणि त्यांतलीं कांहीं खांडोळी आमच्या स्वतंत्र हुकमतीखालीं द्या अशी मागणी करण्याला तो समाज मुळीच मागेपुढे पहाणार नाहीं; आणि, अशी मागणी पुढे आली कीं गांधीजी म्हणणारः यादवी टाळावयाची असेल तर ही मागणी निमूटपणे मान्य केली पाहिजे. १४ाकि