पान:महमद पैगंबर.djvu/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० पाकिस्तानचे संकट गांधीजींच्या या म्हणण्यांत अहिंसाप्रेम असेल; पण त्यांना जी शूरांची अहिंसा अभिप्रेत आहे तिचा मात्र यांत कुठेच मागमूस लागत नाहीं ! आणि तो मागमूस अशा उद्गारांत लागावा तरी कसा ? शूरांची अहिंसा समाजांत झळकू लांगावयाची असेल तर समाज प्रथम शूर बनला पाहिजे. शौर्यच नसेल तर शूरांची अहिंसाहि संभवत नाहीं. शंभर वेळां शौर्य गाजविणारा मनुष्य, तसा प्रसंग येईल तेव्हां, शूरांची अहिंसा आचरून दाखवील; पण,ज्याने शौर्याचा एकहि प्रसंग पाहिला नाही अशा माणसाकडून अगर अशा समाजाकडून शूरांच्या अहिंसेचे आचरण व्हावे कसे ? औरंगजेबाच्या अमानुष छळाची कल्पना दृष्टीपुढे मूर्तिमंत नाचत असतां, त्याला बेदरकारपणे उत्तर देऊन, मरणाला मिठी मारणारे हुतात्मा श्री संभाजी महाराज शूराची अहिंसा कशी असते हे स्वत:च्या उदाहरणाने दाखवू शकतात ! स्वतःच्या लेकरांचा चाललेला अमानुष छळ निमूटपणे साहून, अभयवृतीने मरण पतकरणाच्या शीख गुरुश्रेष्ठांनी शूरांच्या अहिंसेची भाषा काढली तर ती शोभून दिसते ! पुढच्या जन्मींची फाशीची शिक्षाहि आतांच देत असाल तर द्या असे म्हणून, हातांत भगवद्गीता घेऊन, हंसतमुखाने फांसावर लटकण्याला प्रवृत्त होणा-या । दामोदरपंत चाफेकरांच्या तोंडीं शूराची भाषा शोभेल ! कानपूरच्या दंग्यांतं, मृत्यु समोर दिसत असतां, बिलकुल न डगमगतां मरण पत्करणाच्या गणेश शंकर विद्यार्थीजींनीं शूरांच्या अहिंसेची महति सांगितली तर ती सार्थ ठरेल! पण, जो समाज अॅसव्वाशे वर्षे परकी अंमलामुळे पिचून निजाला आहे, ज्या समाजाला साधे जीवन जगण्यासाठीं हरघडी मानहानीचे प्रसंग गिळावे लांगत आहेत आणि ज्या समाजाला सर्वांगीण प्रतिकाराची शिकवण , नीटशी देण्यांतच आलेली नाहीं त्या समाजाकडून शूरांच्या अहिंसेचे पालन व्हावे कसे ? अशा समाजाला शुरांच्या अहिंसेचे पालन करावयाला सांगणे म्हणजे, अहिंसेवर विश्वास न ठेवणाच्या लोकांच्या भक्ष्यस्थानीं -.: त्या समाजाची योजना करणेच होय. तात्पर्य असे कीं, अहिंसावाद आणि हिंदु-मुसलमान यांच्या विषयींचे धोरण या दोन्ही बाबतींत काँग्रेसचे धोरण गेली २०-२१ वर्षे पार चुकत आलेले असल्यामुळे, एक तर या दोन्ही बाबतींतलें धोरण काँग्रेसने बदललें .....।

  • .
.