पान:महमद पैगंबर.djvu/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १८१ हे सैन्यसामर्थ्य सिद्ध करतांना, परकी सरकारकडून आज होत असलेली उघळमाधळ होता कामा नये, हे खरे आहे. पण, ही उधळमाधळ टाळण्याचे धोरण सांभाळिल्यानंतर, सैन्याप्रीत्यर्थ जो खर्च होईल तो दुस-या रूपाने सर्व प्रांतांना परत मिळेल, ही विचारसरणीच यापुढे वाढवीत राहिले पाहिजे. पांच पांच कोटी लोकसंख्येची चिमुकलीं राष्ट्र सध्यां सालोसाल परार्धावधि पौंड सैनिक-सज्जतेवर खर्च करीत असतात. एका हाताने होत असलेला हा खर्च दुस-या हाताने परत मिळत असतो, यामुळेच या गोष्टी युरोप, जपान वे अमेरिकेमध्ये घडतात. सैनिक-सिद्धतेमुळे पायदळ, घोडदळ, नाविकदळ; विमानदळ इत्यादि नानाप्रकारच्या दळांतून हजारों माणसांना कामे करावी लागतात आणि या माणसांना मिळणाच्या वेतनावर अशा हजारों माणसांच्या कुटुंबांतील लक्षावधि लोकांचा योगक्षेम चालतो. सैनिक-सिद्धतेसाठी देशांत शस्त्रनिर्मितीचे, विमाननिर्मितीचे, मोटार-निर्मितीचे असे हजारों कारखाने चालतात आणि या कारखान्यांत कामगारांना जें वेतन मिळते तेंहि देशांतील लक्षावधि लोकांच्या उपजीविकेला उपयोगी पडते. अशा दृष्टीने विचार केल्यास, राष्ट्रीय व राष्ट्रहितदक्ष सरकारकडून केली जाणारी लष्करी सामर्थ्याची सिद्धता ही देशाच्या योगक्षेमालाच कारणीभूत होत असते. अशा सैनिक-सिद्धतेसाठीं करभार देणे हे नागरिकांचे कर्तव्यच आहे. प्रजानामेव भूत्यर्थं स ताभ्यो बलिमग्रहीत् । । सहस्रगुणमुत्स्रष्टुं आदत्ते हि रसो रविः ॥ या वचनांत सूचित केल्याप्रमाणे, सूर्य जसा पृथ्वीवर पर्जन्यवर्षाव करण्यासाठींच जलाचे शोषण करीत असतो तद्वतच, राष्ट्रीय सरकारहि सर्व देशावर समद्धीचा व सुबत्तेचा वर्षाव करण्यासाठींच कराच्या पैशांचे शोषण करीत असते. नुसते राष्ट्ररक्षणाचे खचक काम करणा-या व राष्ट्रहितकारी उद्योगांत (Nation-building activities) प्रत्यक्ष न पडणाच्या मध्यर्वात सरकारबद्दल कांहीं प्रांतांतून कांहीं गैरसमज असतील तर, त्या गैरसमजाची कोळिष्टके काढून टाकली पाहिजेत ! डॉ० आंबेडकर त्या कोळिष्टकांना अप्रत्यक्षपणे थोमाळतात कसे, याचे आश्चर्य वाटते ! कटकटी टाळण्याचे डॉ. आंबेडकरांचे शास्त्र कांहीं अजब आहे ! हिंदू