पान:महमद पैगंबर.djvu/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ पाकिस्तानचे संकट लोकांना जर कांहीं शिकवावयाचे असेल तर ते 'कटकटी टाळा' हे नसून कटकटी निर्माण करा हे आहे.. घरांत घुसू पाहणाच्या संकटांची कटकट नको म्हणून घरांत दडून राहण्याची आणि घराच्या काळोख्या कोंपयांत छपून । बसण्याची घातघेणी वृत्ति हिंदूंत बळावली म्हणून तर हिंदु आज अनर्थपरंपरा सोशीत आहेत. कटकटी टाळण्याचेच तत्त्वज्ञान त्यांच्यापुढे मांडून भागेल कसे ? १ घरांत घुसू पाहणारे संकट घराबाहेर आहे तोंच त्याच्याशी कटकट कशी सुरू करावी आणि त्या संकटासमोर मूर्तिमंत संकट म्हणून उभे कसे राहावे, हेच हिंदूंना ऐहिक व्यवहारांत शिकावयाचे आहे. कटकट टाळू पाहणारा समाज कटकट टाळू शकत नाहीं ! उलट, नसत्या कटकटी हात धुऊन त्याच्यामागे लागतात, हा स्वतःच्या इतिहासाचा व जगाच्या इतिहासाचा बोध हिंदूंनीं दृष्टिआड करण्यासारखा नाहीं ! आज जी राष्ट्रे स्वराज्योपभोग आणि स्वातंत्र्योपभोग घेत आहेत ती राष्ट्रेहि कटकटींना कंटाळलेलीं नाहींत; उलट, कटकटी निर्माण करण्याकडेच त्यांची वाढती प्रवृत्ति आहे ! हिंदुसमाज कटकटींना कंटाळला तरी भोंवतालचे समाज जोपर्यंत तसे कंटाळलेले नाहीत, तोपर्यंत एकट्या हिंदुसमाजाला कटकटींचा कंटाळा येऊन भागणार नाहीं. दुसरे आपल्या कटकटी तुमच्या घरांत घुसवितील आणि त्या कटकटींमुळे तुमचा जीव हैराण होईल ! हिंदुस्थानांत-म्हणजे पाकिस्तान वगळून उरलेल्या हिंदुस्थानांतस्वराज्य सिद्ध झालें, इंग्रज आपली बाडबिछायत उचलून कायमचे विलायतेस गेले तरीहि या मर्यादित हिंदुस्थानला कटकटी टाळण्याचे तत्त्वज्ञान स्वीकारता येणार नाहीं ! या मर्यादित हिंदुस्थानांत जे दोन को मुसलमान आहेत त्यांचे उद्योग कोणत्या प्रकारचे चालतात, त्यांची संधानें कोणाशीं चालू आहेत,त्यांची वळणे कोठे कोठे आहेत, हैद्राबादचा निजाम कोणतीं पाताळयंत्री कारस्थाने खेळत आहे, त्रावणकोर-कोचीन भागांतील खिस्त्यांचा जमाव आपली पावले कोणत्या दिशेने टाकीत आहे आणि या सर्व प्रकारामुळे उद् भवणाच्या कटकटींना पुरून उरण्याइतकें खंबिरीचे सामर्थ्य आपल्या जवळ आहे की नाही, याचा विचार हिंदुस्थानांतील हिंदूंना अहर्निश करावाच लागेल.