पान:महमद पैगंबर.djvu/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"१७४ पाकिस्तानचे संकट दारांचे हित साधण्यासाठी पाकिस्तानची मागणी मान्य केली तर, पाकिस्तान व हिंदुस्थान या दोघांच्याहि टाळक्यावर ती सत्ता राहील आणि हिंदुस्थानच्या व पाकिस्तानच्या लष्करांचा संसार कसा थाटावयाचा हे ती सत्ता आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या व स्थैर्याच्या दृष्टीने ठरवील, हिंदुस्थानांत मनुष्यबळ भरपूर असेल; त्या मनुष्यसमूहांत सुप्त असे सैनिक गुणहि भरपूर असतील! युद्धोपयोगी वस्तूंचे प्रचंड कारखाने चालविण्याला अवश्य असणा-या वस्तुज़ाताची वाणहि या भागांत नसेल–हें सर्व अगदी खरे असले तरी,हिंदुस्थानच्या डोक्यावर ब्रिटिशांची सत्ता असे तोपर्यंत याचा योग्य तो उपयोग होईलच, असे कसे मानावे ? सध्यां एवढा घनघोर संग्राम चालू आहे, हिंदुस्थानला संतुष्ट राखल्यास हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध होईल अशा सूचना अमेरिकेंतूनहि अधूनमधून दिल्या जात आहेत, तरी प्रत्यक्ष सृष्टीत काय घडत आहे? ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे हिंदुस्थानच्या, दोन हातांकडे असणारे साम्राज्याचे भाग जितके महत्त्वाचे ठरत आहेत तितकें महत्त्व हिंदुस्थानला नाहीं असेच स्पष्टपणे दर्शविण्यांत येत आहे. लष्करांतील मोक्याच्या जागा ऑस्ट्रेलियनांना दिल्या जात आहेत आणि यद्धपरिस्थितीचा फायदा घेऊन देशांतील कारखानदारी वाढवावी म्हणून तळमळत असणा-या शेठ वालचंद हिराचंद यांच्यासारख्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत ! युरोपांत. एक सोडून शंभर 'डंकर्क' झाली तरी, हिंदुस्थानशीं वागण्याचा ताठा सोडण्याचे ब्रिटिश लोकांना कारण पडत नाहीं. तोपर्यंत हिंदुस्थानच्या भवितव्याची कल्पनाचित्रे रेखाटीत बसण्यांत काय तात्पर्य ?, मुसलमानांना • ••••••••••----->२००=००९ 4 V म्हणजेच विजय रक्तशुद्धिसुधा वापरून रक्तावर विजय मिळवा. सर्व औषधांचा कॅटलॉग आजच मागवा. * * आयुर्वेदीय औषधी भांडार, तुळशीबागेजवळ, पुणे २.४

-= -

=- =-