पान:महमद पैगंबर.djvu/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १७३ जगभर पसरलेला फापटपसारा सावरण्याचे व आवरण्याचे सामर्थ्य एकट्या इंग्लंडच्या मनगटांत राहील, की या मनगटांतील शक्ति पुरेशी ठरण्यासाठी इंग्लंडला अमेरिकेकडे पाहावे लागेल, भूमध्य समुद्र इंग्लंडच्या पूर्वेकडील हालचालींच्या दृष्टीने कितीसा खुला व सुरक्षित राहील, ईजिप्तपासून अफगाणिस्थानपर्यंत पसरलेल्या मुसलमानी राष्ट्रांचे संघटन होऊ देण्यांत धोका आहे हे ओळखून युरोपियन राष्ट्रे इराण, इराक वगैरे भागांत स्वतःच्या लष्करी सामर्थ्याची पाचर ठोकून ठेवतील की काय, इत्यादि अनंत भानगडींचे प्रश्न सुटल्याखेरीज व समजल्याखेरीज हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या प्रश्नाचे भवितव्य वर्तविणे हे एकादी अदभुतरम्य कादंबरी लिहिण्यासारखे ठरण्याचाच संभव दृढ आहे. आणि यामुळेच, डॉ. आंबेडकर यांनी या प्रश्नाची केलेली निष्कर्षात्मक चर्चा कांहीं अंशीं निर्जीव वाटते. हिंदंना जागत करण्याचे कार्य त्यांनी केलेल्या चर्चेमुळे उत्तम प्रकारे होत आहे, हे मात्र मान्य केले पाहिजे, | पाकिस्तान वगळून उरणाच्या हिंदुस्थानच्या संरक्षणाचा प्रश्न विचारांत घेतांना डॉ. आंबेडकर यांनी पहिलाच मुद्दा असा मांडला आहे कीं, पाकिस्तान निर्माण होतांच ते हिंदुस्थानशीं युद्धाला प्रवृत्त होईल असे समजण्याचे कारण नसल्यामुळे, संरक्षणाचा प्रश्न तांतडीचा नसून सबुरीचा आहे. हे मत एकदम मान्य करण्यासारखे नाहीं. । पाकिस्तान हिंदुस्थानपाशी युद्ध केव्हां करील हा प्रश्न पाकि स्तानची प्रस्थापना कोणत्या परिस्थितींत होईल यावर फार मोठ्या ... प्रमाणांत अवलंबून राहील. चाल लढाई सुरू असतांनाच हिंदुस्थानांतली ब्रिटिश सत्ता दुर्बल झाली असल्याचा मसलमानांना सुगावा लागला आणि त्यामुळे जिवावर उदार होऊन पाकिस्तान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभिला तर, पाकिस्तानच्या प्रस्थापनेनंतरच नव्हे, तर त्याच्या आधीपासूनच हिंदुस्थान व पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होईल ! या संभाव्य संग्रामांत हिंदुस्थानांत असणारें ब्रिटिश सैन्य हिंदूंच्या बाजूला वळेल कीं मुसलमानांच्या बाजूला वळेल, हिंदु व मुसलमान संस्थानिक काय करतील इत्यादि प्रश्न लक्षांत घेऊनच या विषयाचे उत्तर द्यावे लागेल. ब्रिटिश सत्ता विजयी झाली आणि तिने मुसलमानांना संतुष्ट करण्यासाठीं अगर ब्रिटिश व्यापा-यांचे व कारखान