पान:महमद पैगंबर.djvu/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १७५ पाकिस्तान मिळावयाचें कीं नाहीं हा प्रश्न एकट्यादुकट्या कारणाचा अगर घुटनेचा विचार करून सुटण्यासारखा नाहीं ! तो कोणीहि व कसाहि सोडवू घाहील तर, आपल्या इच्छाशक्तीचा जबरदस्त अडसर घालून, हिंदु कांहीं प्रतिकार करू शकतील की काय एवढ्याच प्रश्नाचा विचार करणे हिंदूंच्या हातचे आहे. . हिंदुस्थान आजच्या परिस्थितीत आहे तसाच अखंड राहिला तर त्याला सुरक्षित सरहद्दीचा नैसर्गिक फायदा पुढेहि मिळू शकेल. हिंदूंनीं पाकिस्तान मान्य केले आणि सध्यांची सरहद्द पाकिस्तानवाल्यांच्या हातांत गेली तरी फारसे बिघडत नाही, असे मत डॉ० आंबेडकर यांनी प्रतिपादिले आहे. हे मत अत्यंत धाडसाचे आहे. आज सरहद्दीपलीकडे नुसत्या पठाणांच्या टोळ्या आहेत तर त्या टोळ्यांचा त्रस्त समंध शांत राहावा म्हणून सरकारला केवढा खटाटोप व केवढा खर्च करावा लागत आहे ! हे टोळीवाळे पठाण आणि सिंध, पंजाबमधील मुसलमान सगळे एक झाले तर त्या बाजूने हिंदुस्थानवर केवढे संकट येईल आणि हे संकट हिंदुस्थानला एकसारखें भेडसावीत क़से राहील याची कल्पना डॉ. आंबेडकरांना झाली नाही, हे मोठे आश्चर्य आहे ! नव्या हिंदुस्थानची सरहद्द थेट गुजराथपासून संयुक्तप्रांत काश्मीरपर्यंत पसरलेली राहील. इराण, अफगाणिस्थान या वाटेने या घातक सरहद्दीपर्यंत हवे तेवढे लढाऊ मनुष्यबळ व युद्धसाहित्य येऊ शकेल. पूर्वेच्या बाजूला बंगालमध्ये जे मुसलमानी राज्य निर्माण होईल त्या राज्यांत समुद्रमाने व ब्रह्मदेशच्या मार्गाने हव्या तेवढ्या उपद्रवी वस्तु आणि हवीं तेवढी उपद्रवीं माणसे येऊ शकतील. . मध्यप्रांत, मुंबई इलाखा, मद्रास इलाखा व ओरिसा प्रांत यांना स्पर्श करणारें हैद्राबाद संस्थान किती तापदायक ठरेल हेहि कल्पनेला समजण्यासारखे आहे. पाकिस्तान मान्य केल्याने नुसती नैसगिक सुरक्षित सरहद्द सुटते इतकेच नसून, अनेक सरहद्दी व आजच्याहून व्यापक अशा सरहद्दी धोक्याच्या बनतात आणि खुद्द हिंदुस्थानच्या काळजांत एक विषारी कांटा ऋतून राहतो ! अशा परिस्थितींत, निसर्गाने दिलेली व आज शतकानुशतकें सिद्ध झालेली नैसगिक सरहद्द हिदंनी स्वेच्छेने कां सोडावी हे समजणे अवघड आहे. सुरक्षितं सरहद्द पाहिजे की विश्वासार्ह मैन्य पाहिजे असा बेमालूम प्रश्न डॉ. आंबेडकरांनीं. हिंदूंना विचारला आहे. हिंदूचे या प्रनाला