पान:महमद पैगंबर.djvu/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी १२१ या सर्व संस्थानांची लोकसंख्या ४६,५२,००७ आहे. मुसलमानांचे प्रमाण अत्यल्प आहे. मयूरभंज या महत्त्वाच्या संस्थानाचे क्षेत्रफळ ४,२४३ चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ९,८९,८८७ आहे व वार्षिक उत्पन्न ३४ लक्ष रुपये आहे. मध्यप्रांत, ओरिसा व मद्रास इलाखा यांच्या सीमेवर असणारें बस्तर संस्थानहि मोठे आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ११ हजार चौरस मैल आहे. त्याची लोकसंख्या ५,२४,७२१ असून वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लक्ष रुपये आहे. अशी हीं शेंकडों क्षुद्र संस्थाने, त्यांचे बादशाही संबंध वगैरे संभाळून अखिल भारतीय फेडरेशन अस्तित्वात आणून, स्वराज्याची व स्वातंत्र्याची मजल गांटावयाची म्हणजे एक संकटच आहे. यामुळे, अशी सूचना करण्यांत येत असते कीं, अगदी लहान संस्थानांच्या मालकांना वर्षासन नेमून द्यावे व त्यांचा मुलुख खालसा करण्यांत यावा. . पुढील प्रकरणांत मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजनांचा विचार करतांना, पाकिस्तानमध्ये संस्थानी मुलुख किती मागितला जातं आहे हे ठरवितांना, वरील संस्थानविषयक माहिती उपयोगी पडेल. जुनी दुर्मिळ पुस्तके मिळण्याचे पुण्यांतील एकच ठिकाण! | डी. व्ही. ब्रदर्स, बुकसेलर्स ४९५ शनिवार, मेहुणपुरा कॉर्नर, पुणे २. शाळा कॉलेजांना लागणारी जुनी व नवीं पुस्तके विकत मिळतात; तसेच जुनी पुस्तकें योग्य किंमतीस विकत घेतली जातात.