पान:महमद पैगंबर.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:. . . प्रकरण ७ दें। मुसलमानांनी मांडलेल्या पाकिस्तानच्या योजना सुस्लीमलीगर्ने २६-३-१९४० रोजी लाहोर येथे जो ठराव पास केला त्यांत प्रांतपुनर्घटनेचे तत्त्व कोणते असावें ही गोष्ट स्पष्ट झाली. लीगनें पाकिस्तानचा पुरस्कार अधिकृतरीत्या केला असे त्या ठरावावरून स्पष्ट होते. लीगने सुचविलेली प्रांतिक पुनर्घटना झाली की पुढे काय होईल याची कल्पना जगाला व्हावी म्हणून, लीगने आपल्या कारभारी मंडळाला कांहीं बाबतींत अधिकार देऊन टाकला. राष्ट्ररक्षण, परराष्ट्रीय संबंध, रस्ते-रेल्वे वगैरे दळणवळणाची साधने, जकात इत्यादि सर्व बाबतींतले अधिकार शेवटीं पुनर्घटित प्रांतांपैकी प्रत्येकाला मिळावें अशा दृष्टीने या कारभारी मंडळाने एक योजना आंखावयाची आहे. इतक्या सर्व क्षेत्रांतले अधिकार प्रत्येक प्रांतिक घटकाकडे यावयाचे याचा अर्थच असा की, सर्व हिंदुस्थानची मध्यर्वात सत्ता शिल्लक राहिलीच तरी, तिच्या हातीं अधिकार कांहीं नसावा, असे लीगचे म्हणणे आहे. | आपल्या कल्पनेप्रमाणे प्रांतिक पुनर्घटना झाली तर प्रत्येक प्रांतिक घटकाची स्थिति कशी काय राहील, हिंदुस्थानांत नेमका कोणता मुलुख राहील व पाकिस्तानांत कोणता व किती मुलुख राहील, या पुनर्घटित प्रांतांचे आर्थिक स्थैर्य टिकाऊ ठरेल काय, प्रत्येक प्रांत स्वसंरक्षणक्षम ठरेल काय, प्रांतांची अशी विभागणी झाली तर त्या गोष्टीचा भविष्यकाळी सगळ्या हिंदुस्थानवर काय परिणाम होईल इत्यादि तपशिलाच्या गोष्टी बोलण्याची लीगची तयारी माहीं. इतर संस्थांनीं लीगची तत्त्वे प्रथम मान्य करावी असा बॅ० जीनांचा आग्रह आहे. तपशीलवार योजना पुढे आल्याशिवाय योजनेचा विचार करावयाचा कसा, अशा आशयाचा प्रश्न विचारून राजेंद्रबाबूप्रभृति लोक