पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( का. पत्रे, यादी ५८). १७४० च्या नोव्हेंबरपासून १७४१ च्या एप्रिलपर्यंत बाळाजी निजाम, भोसले ह्यांच्या राज्यांत व हिंदुस्थानांत गेला होता. १७४१ च्या जुलैपासून अक्टोबरपर्यंत बाळाजी साताऱ्यास होता. १७४१ च्या नोव्हेंबरपासून १७४२ च्या सप्टेंबरपर्यंत तो धारेस होता. १७४२ च्या अक्टोबरपासून १७४३ च्या जूनपर्यंत जयपूर, काशी, प्रयाग, बंगाला वगैरे प्रांतांत होता. १७४३ च्या जूनपासून सप्टेंबरपर्यंत पुण्यास होता. १७४३ च्या अक्टोवरांत स्वारी साताऱ्यास जाऊन १७४४ च्या एप्रिलमेंत पुण्यास आली. १७४४ च्या नोव्हेंबरांत नाशिकावरून कोंकणांत शिरून डिसेंबरांत पुण्यास आला. १७४५ च्या जानेवारीत भेलशावर स्वारी करून आगष्टांत पुण्यास आला. १७४५ च्या नोव्हेंबरांत साता-यास जाऊन तेथून १७४६ च्या माचीत निरोप घेऊन स्वारा पढरपुरास गेली ( का. पत्रे, यादी ६८) व जूनांत पुण्यास आली. तेथून तो कोंकणांत सप्टंबरांत जाऊन १७४७ च्या मार्च एप्रिलांत पुण्यास आला. १७४७ च्या डिसेंबरात खानदेश, बेदर वगैरे निजामाच्या प्रांतांत जाऊन १७४८ च्या मार्च एप्रिलांत पुण्यास आला. १७४८ च्या सप्टंवरांत हिंदुस्थानांत मकसुदाबाद, प्रयाग वगैरेवर स्वारी करून १७४९ च्या आगष्टांत साता-यास आला. १७४९ च्या डिसेंबराच्या १५ व्या तारखेस शाहराजा वारला. त्यावेळी बाळाजी साताऱ्यास होता व पुढे १७५० च्या जानेवारीत नवा राजा करून एप्रिलांत बाळाजी पुण्यास आला. रा. गोगटे वगैरे मडळी शाहूच्या मृत्यूचें साल १७४८ देतात. परंतु, ती चूक आहे. १७५० च्या पुढील बाळाजाच्या हालचालींचा तख्ता मागें दिलाच आहे. ह्यावरून इतकें समजून येईल की १७३८ पासून १७६१ पर्यंत बाळाजी सबंद वर्षभर अमुक एक ठिकाणी सतत कधीच राहिला नाही. सदा चोहोंकडे फिरण्यांत त्याचा वेळ गेला. हीच स्थिति बाकीच्या पुढान्यांची व सामान्य सैनिकांची होती. पावसाळ्यांत छावणीत असतांना या लढवय्यांना विलास करण्यास कितपत सोय व साधने असत ते समजण्यास मजजवळ सामग्री नाही. पावसाळा खेरीज करून बाकीचे आठ महिने सर्व हिंदुस्थानभर घिरट्या घालण्यांत हाडांची कार्ड ह्या पुढा यांना व शिपायांना करावी लागत हे सिद्ध करण्यास हवीं तितकी साधने आहेत. ___ आतां आणखी एका मद्याचा विचार करून हे विवेचन संपवितो. गिलज्यांच्या धिप्पाड च अर्बुज शरीरांपुढे मराठ्यांच्या लहान व वामनमर्तीचा टिकाव लागला नाही ह्मणून एक आक्षेप आहे. गिलज्यांच्या लांबीरुंदीपेक्षा मराठ्यांच्या शरीराचें क्षेत्रफळ कदाचित् लहान असेल; परंतु, लढाईत ह्या क्षेत्रफळावरच मोठी भिस्त असते असे नाही. जर्मन, फ्रांक ह्या रानटी लोकांच्या लांबीरुंदीपेक्षां सीझराच्या रोमन सैनिकांची उंचो व रुदी कमी असे. परंत, मांक लोकांच्या पाव अर्धा फट उंचीचा वचपा रोमनलोक भयंकर रीतीने भरून काढीत हे प्रसिद्ध आहे. तोच प्रकार मराठ्यांचा होता. कर्नाटकांतील राठ व धिप्पाड शेतकरी, मथुरा वृंदावनांतील गलेलठ्ठ बैरागी, पंजाबांतील उंच, धिप्पाड व ढिसूळ खि, रजपुतान्यांतील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड, ह्या सर्वांना लहान्या परंतु