पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खाजगी पत्रव्यवहार सांपडल्यावांचून ह्या प्रश्नाचा उलगडा यथास्थित व्हावयाचा नाही व तोपर्यंत त्यासंबंधी मूकव्रत आचरणेच श्रेयस्कर होईल. (३) हिंदस्थानांत त्यावेळी राष्ट्रियत्वाची आधुनिक कल्पना सर्वत्र पसरली नव्हती हे खरे आहे. ती पसरविण्याचाच तर मराठ्यांचा मुख्य प्रयत्न होता. महाराष्ट्रधर्माची पताका घेऊन मराठे १६४० त जे निघाले ते तिला आस्ते आस्ते हिंदुस्थानांत सर्वत्र हिंडवीत असतां त्यांच्यावर १७६१ त हा घोर प्रसंग आला. हा प्रसंग येण्याच्या पूर्वी कित्येक प्रांतांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार झाला होता व कित्येक प्रांतांत व्हावयाचा होता. उत्तरेकडील प्रांतांत तो झाला नव्हता ह्मणून तर तत्रस्थ हिंदूलोकांनी यवनांचे साहाय्य केलें व मराठ्यांचा द्वेष केला. हा द्वेष का झाला त्याचा विचार पुढील विवेचनांत करितो.परंतु पुढील विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी मराठ्यांच्या कांटकपणासंबंधी दोन शब्द लिहिले पाहिजेत.महाराष्ट्रांतील लोकांच्या अंगी अनन्यसामान्यत्वेकरून एखादा जर कोणता गुण असेल तर तो त्यांच्या अंगचा कांटकपणा हा होय. विलास आणि मराठा ह्या दोन अर्थाची व्याप्ति मागेहि कधी झालो नाही व पुढेंहि कधी होईल असा रंग दिसत नाही. साधी रहाणी आणि उच्च विचार हे दोन गुण मराठ्यांच्या स्वभावाचे मख्य घटक होत. पैकी उच्च विचाराचा विसर मराठ्यांना अधून मधून कधी पडला असेल; परंतु साधी रहाणी मराठ्यांनी आजपर्यंत कधीहि सोडलेली इतिहासात माहीत नाही. साध्या रहाणीची, कांटकपणाची व विलासपराङ्मुखतेची संवय मराठ्यांच्या अंगी १७५० पासून १७६१ पर्यंत कितपत होती हैं पहावयाचे असल्यास त्यावेळच्या पुढाऱ्यांच्या हालचालींचें प्रेक्षण करावें ह्मणजे झाले. मागे बाळाजी बाजीराव, सदाशिव चिमणाजी, रघुनाथ वाजीराव, विश्वासराव, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजा, वगैरे पुढाऱ्यांच्या हालचालींचें तख्ते दिले आहेत त्यावरून विलास करण्याला ह्या पुरुषांना किती वेळ सांपडत असेल त्याचा ज्याचा त्यानेच विचार करावा. बाळाजी बाजीराव विलासी व आळशी होता ह्मणून ग्रांटडप वगैरे लोक ह्मणतात त्यांत बिलकूल तथ्य नाही. बाळाजी बाजीरावाचा सालवार इतिहास ग्रांटड फला माहीत नव्हता; त्यामुळे ज्या वर्षांचा इतिहास माहीत नसेल त्या वर्षी बाळाजी बाजीराव विलास करीत असे असा डफचा अंदाज आहे. परत. मागे दिलेल्या तख्त्यावरून दिसून येईल की १७५० पासून १७६१ च्या जूनपर्यंत एकाहि वर्षी पावसाळ्याखेरीज बाळाजी पुण्यास नव्हता. प्रत्येक वर्षाचे आठ महिने बाहेर काढण्याचा त्याचा परिपाठ असे. १७३८ पासून १७५० पर्यंतहि बाळाजी एकसारखा हिंडत होता हे दाखवन देण्यास साधने आहेत. इ. स. १७३८१३९ ही दोन साले बाळाजी साताऱ्यास होता. १७४० च्या मार्च एप्रिलांत बाळाजी पुण्यास होता ( का. पत्रे, यादी ५८). शाहमहाराज यांच्या चरित्रांत ( पृष्ठ १६१ ) राजश्री गोगटे हाणतात की, बाळाजी १७४० च्या एप्रिलांत सातायास होता; परंतु, तें काव्येतिहाससंग्रहांतील पत्रे यादी ५८ वरून बरोबर नाही. १७३९ च्या १७ एप्रिलास बाळाजी साताऱ्यास होता ( का. पत्रे, यादी ४५). १७४० च्या एप्रिलपासून जूनपर्यंत बाळाजी कोंकणांत आंग्र्याच्या मदतीला गेला होता