पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केले होते. त्या मराठ्यांना अर्बुज गिलज्यांचे किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याहि मनुष्यांचे भय मागे कधी वाटले नाही व पुढे कधी वाटणार नाही. १४ जानेवारी १७६१ च्या लढाईत मराठ्यांचा पराजय झाला ह्मणून जर गिलज्यांच्या धिप्पाडपणाचे पोवाडे गावयाचे असतील तर २३ नोव्हेंबर व ७ डिसेंबर १७६०च्या लढायांत मराठ्यांचा जय झाला ह्मणून गिलज्यांज्या धिप्पाडपणाचे क्षुल्लकत्वहि वर्णन करणे जरूर आहे. तात्पर्य, शरीराच्या लहानमोठेपणाचा परिणाम पानपतच्या लढाईत कांहींच झाला नाही. कां की मराठी सैन्यांत येथून तेथून सर्व मराठेच होते असा प्रकार बिलकूल नाही. मराठे सैन्य पंचभेळ असे. परदेशी, मराठे, मुसुलमान, आहीर, अडारु, आरव, रजपूत, वगैरे सर्व प्रकारचे लोक मराठी सैन्यांत असत. विवेचन सहावें. मराठ्यांचे हिंदुस्थानांत कार्य काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या व तिसऱ्या विवेचनांत बहुतेक उल्लेखिलेंच आहे. ह्या विवेचनांत त्याचा निर्देश आणखी विस्तृत करून दाखवितो. मराठ्यांचे हिंदुस्थानांत मुख्य कार्य झटले झणजे महाराष्ट्रधर्माचा प्रसार करणे हे होय. समर्थांनी ज्याला महाराष्ट्रधर्म ह्मणून संज्ञा दिली तो केवळ हिंदुधर्मच नव्हे. महाराष्ट्रधमांत स्वराज्यस्थापनेचा व गोब्राह्मणप्रतिपालनाचाहि अंतर्भाव होतो. हिंदुधर्म, स्वराज्य व गोब्राह्मणप्रतिपालन ह्या तीन गोष्टींची स्थापना करावयाची झटले झणजे राष्ट्रांतील लोकांची एकी झाली पाहिजे व त्या एकीचा पुढाकार करण्यास का लोकांनी पुढे सरसावले पाहिजे. हीहि गोष्ट त्यावेळच्या मराठ्यांच्या स्पटपणे ध्यानात आली होती. मराठ्यांखेरीज हिंदुस्थानांतील इतर लोकांच्या ध्यानांत ही गोष्ट अगदीच आली नव्हती असें नाही. हिंदुधमर्माची स्थापना व गोब्राह्मणांचे प्रातपालन केले पाहिजे ही कल्पना शाख लोकांच्या व बुंधल्यांच्या डोक्यांत अकबराच्या वेळेपासून, कदा चत् त्याच्याहि पूर्वी, आली होती असे ह्मणण्यास आधार आहे. परंतु ही कल्पना साक्षात् सिद्ध करून दाखविण्यास जी तडफ, जो निश्चय, जी जूट व जे पुढारपण लागते त्याचे अस्तित्व ह्या लोकांच्या ठायीं होते असे इतिहासावरून दिसत नाही. सुदैवाने ह्या गुणांचे अस्तित्व त्या काली मराठ्यांच्या अंगीं होते व ह्मणूनच त्यांच्या हातून स्वराज्याची स्थापना होऊन हिंदुधर्माचे व गोब्राह्मणांचे प्रतिपालन झाले. १६४६ पासून १७०७ पर्यंत महाराष्ट्रधर्माची शुद्ध कल्पना महाराष्ट्रांत विराजत होती. तोपर्यंत हिंदुधर्माचा, म्वराज्याचा व गोब्राह्मणांचा छल अवरंगझेबाच्या हातून होत होता. त्याच्यापुढे हा छल बंद झाला. स्वराज्याची स्थापना झाली आणि गोब्राह्मणांची व हिंदुधर्माची दीन दशा कायमची संपली. १७२० च्या सुमारास महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माची पूर्ण स्थापना झाली व महाराष्ट्रांतील हिंदुधर्माला व गोब्राह्मणांना कोठूनहि भीतीचे कारण उरले नाही. सारांश, स्वराज्याच्या स्थापनेमुळे महाराष्ट्रांतील लोकांना सुखाचे दिवस दृष्टीस पडले. परंतु महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतील लोकांना महाराष्ट्रांतील लोकांच्या सुखाचें बांटेकरी हा वेळपर्यंत होता आले नाही. खरे मटले असतां अवरंगझेबाच्या कारकीर्दी ।