पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुरजमल जाटाचे व भाऊचे वाकडे आले होते हे खरे आहे; परंतु ते देखील भाऊने बाहेर कोणाला दिसू दिले नाही. सारांश भाऊच्या हातून उद्दामपणाचे वर्तन होणे केवळ अशक्य होते. -२३ डिसेंबरपर्यंत, कदाचित् ४ जानेवारी १७६१ पर्यंत, भाऊच्या हालचालीचा व डावपेचाचा वृत्तांत दिला आहे. आतां भाऊचा प्रतिस्पर्धी जो अबदाली त्याने डावपेच काय केले त्यांचाहि निर्देश केला पाहिजे. १७६० च्या मेंत अबदाली अनुपशहरी जाऊन बसला. नेव्हांपासून २५ अक्टोबरपर्यंत तो अंतर्वेदीत अनुपशहर व शिकंदरा ह्या दोन ठाण्यांना सोडून कोठे गेला नाही. सुजाउद्दौला वगैरे साथीदार मिळवून आणण्याचे काम नजीबखानाने केले. आगष्टसप्टेंबरांत अबदालीची तर फारच हलाखी झाली होती. त्याच्या गोटांत सर्वत्र फुटाफुट होत चालली होती. सदाशिवरावाला अक्टोबरांत गोविंदपंताने जर यथास्थित मनापासून मदत केली असती तर अबदाली अगदी ठार बुडाला असता. अबदालीने आपण होऊन अमुक एक डावपेच केला व तो सदाशिवरावाला भोंवला असें कदाचित्च उदाहरण सांपडेल. गोविंदपंताचा आळशीपणा व कुचराई अबदालीच्या कामास आली. दिल्ली व पानिपत ह्यांच्यामध्ये अबदाली सांपडला असतां त्याला कोंडून टाकण्याचे व घाबरवून सोडण्याचे सर्वस्वी गोविंदपंताच्या हातांत होते. तें गोविंदपंतानें करावयाचे टाकल्यापासून अबदालीचा फायदा अतोनात झाला. अवदालाने अमूक एक डाव योजिला व त्यामुळे सदाशिवराव फसला असा प्रकार मुळीच झाला नाही. मराठ्यांच्या लष्करांत दुही झाली ती अबदालीच्या पथ्यावर पडली. ह्या दुहीचा अबदालीने चांगला फायदा करून घेतला. मराठे आपल्यापेक्षा जोरदार आहेत हे अबदाली जाणून होता. तव्हां मराठे उपासमारीने अर्धमेले होऊन जात तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध करावयाचें नाहीं हा जो फेबियन डावपेच तो अबदालीने चांगला उपयोजिला ह्यांत संशय नाही. १४ जानेवारी १७६१ च्या युद्धांत अबदालीने कोणते पेच केले ते अस्सल पुराव्याच्या अभावामुळे निर्देशितां येत नाहीत. परंतु ती लढाई होईतोपर्यंत अबादालीने आपण होऊन अमूक एक योजना केली असेंहि पण सांगता येणे शक्य नाही. शत्रूच्या युक्तीपेक्षा मराठे गोंविंदपंताच्या व मल्हाररावाच्या कुचराईमुळे ही मोहीम हरले हा सिद्धांत मात्र सर्वत्र मान्य व्हावा असा दिसतो. ह्या विवेचनाच्या प्रारंभी पानिपतच्या युद्धाची व त्याच्या परिणामाची एकंदर १८ कारणे दिली होती. त्यांपैकी काहींच्या तथ्यातथ्याचा निवाडा करण्याची साधनें वर दिली आहेत. बाकी राहिलेल्या कारणां (४,५,६,१०,१४ ) चा पानिपतच्या मोहिमेशी विशेष संबंध आहे असे मला वाटत नाही. (१) जातिभेदाचा प्रश्न त्यावेळी मुळी उद्भवलाच नव्हता. (२) ब्राह्मणांच्या पोटभेदांतहि परस्पर वैमनस्य वाढून पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला असे विधान करण्यास अद्यापपर्यंत कांहींच आधार पुढे आला नाही. रघुनाथरावदादा, सखारामबापु, महादोबा पुरंधरे, गोपाळराव पटवर्धन, गोपाळराव गणेश, गोविंद बल्लाळ, मल्हारराव होळकर, ह्यांचा १७५० पासून १७६२ पर्यंतचा आणखी बराच