पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती तीच किंवा त्याहून अधिक निकृष्ट अशी दशा ७ डिसेंबराच्या पुढे झाली. ह्या वेळी दुस-या मार्गाचा अवलंब, ह्मणजे अबदालीची फळी फोडून दिल्लीकडे जावयाचा प्रयत्न, भाऊने करणे जरूर होते व कित्येक सरदारांनी ही सूचना केली देखील होती. ती अमलांत आणण्याचे सामर्थ्य भाऊच्या अंगी नव्हतें असें नाही. भाऊ जर सडा असता व कबिल्या बुणग्यांनी त्याच्या हालचाली जखडल्या नसत्या तर अबदालीची फळी फोडून जाणे अशक्य नव्हते. बुणग्यांचें लटांवर टाकून निघून जाणे शोभण्यासारखे नव्हते हे कबूल आहे; परंतु, एकंदर सारासार विचार करितां बुणग्यांना सोडून किंवा त्यांना पानिपतच्या गढींत ठेऊन देशावर येणारी आत्यंतिक हानि टाळण्याकरितां, सदाशिवरावाने जर अबदालीची फळी फोडून दिल्लीकडे कुच केले असते, तर त्याला कोणी त्यावेळी किंवा पुढे मागे दोष देते असे वाटत नाही. जसजसे जास्त दिवस लोटू लागले तसतशी अबदालीची फळी फोडून जाण्याची भाऊची हिंमत कमी होत चालली व दाणागल्याच्या टंचाईमुळे मराठ्यांचे शरीरसामर्थ्यहि खालावत चाललें. अन्नापाण्यावांचून उपाशी मरण्यापेक्षां व शत्रूच्या पुढे मृत्यूची स्वस्थ वाट बघत चसण्यापेक्षा फळी फोडून निघून जाणे सर्वस्वी रास्त होते. परंतु, ते त्या वेळी साध्य होते किंवा नाही हे कळण्यास कोठे आधार नाही. भाऊनें कविले बुणगे बरोबर घेतले ही कदाचित् चूक केली असें नारो शंकराने ध्वनित केले आहे ( लेखांक २४३) व त्यासंबंधानें “ निदान " हा शब्द उपयोजिला आहे. आतां भाऊला स्वतःला कविल्या बुणग्यांची अडचण वाटत होती किंवा नव्हती हे निश्चयात्मक सांगतां येण्यास कांहींच आधार नाही. इतके मात्र खास विधान करितां येते की २३ डिसेंबरपर्यंत भाऊची हिंमत काडीमात्रहि खचली नव्हती. गोविंदपंत वारल्यावर समाधानार्थ बाळाजी गोविंदाला भाऊनें जें २३ डिसेंबरों पत्र पाठविलें त्यांत “आह्मी आहों, सर्व नीट करूं" ह्या धीराच्या व आश्वासनाच्या शब्दावरून अबदालीचें भय सदाशिवरावाला विशेष वाटत होते असे दिसत नाही (लेखांक २७२). २३ नोव्हेंबरी व ७ डिसेंबरी झालेल्या युद्धांच्या अनुभवावरून पुढेहि युद्ध झाल्यास पराजय येईल असें भाऊस वाटत नव्हतें असें ह्या पत्रांतील धीराच्या व आश्वासनाच्या गोष्टीवरून अनुमान काढण्यास जागा आहे. शत्रूची फळी फोडून दिल्ली निधन जाण्याचा भाऊने प्रयत्न केला नाही त्याचे तरी हेच कारण असावे. धाराच्या व आश्वासनाच्या मोठमोठ्या गोष्टी भाऊ बोलत असतां ज्याअर्थी त्याचा १४ जानेवारी १७६१ ला पराभव झाला त्याअर्थी त्याचे वर्तन धीराचे व शांतपणाचे नसून उद्दामपणाचें व सानिपातिक होते असा कोणी कोणी तर्क काढितात. परंत हा तर्क अवास्तव आहे. शांतपणाबद्दल भाऊची पूर्वीपासून ख्याती होती. सबंद १७६० सालभर गोविंदपंताचें वर्तन किती राग आगण्याजोगें होतें हे आतांपर्यंत दाखवून दिले आहे. परंतु गोविंदपंताला लिहितांना भाऊच्या हातून एकहि वावगा शब्द पडलेला सांपडावयाचा नाही. शिंदेहोळकरांच्याहि मर्जीच्या बाहेर भाऊ कधी गेला नाही. त्यांनी सांगितल्या रस्त्यानेच तो आग्रयाकडे गेला.