पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांच्या अद्भुत चरित्रपटाच्या लाखों धाग्यांचा यथास्थित उलगडा करण्यास त्यांचा व त्याच्या मत्सद्यांचा पत्रव्यवहार सांपडला पाहिजे. पहिल्या बाजीरावासंबंधी व बाळाजी बाजीरावाच्या १७५० पर्यंतच्या कारकीर्दीसंबंधी ह्मणजे शाहूमहाराजांच्या सवंद कारकदिसंबंधी देखील अद्याप प्रायः कांहींच सांपडले नाहीं असेंच ह्मणणे भाग पडते. तसेंच, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, रघोजी भोसले, फत्तेसिंग भोसले, गोविंद हरी पटवर्धन, मुरारराव घोरपडे, संभाजी राजे कोल्हापुरकर, दमाजी गायकवाड, दाभाडे, यशवंतराव पवार, यमाजी शिवदेव, गमाजी यमाजी, बाबूजी नाईक बारामतीकर, आंग्रे, अंताजी माणकेश्वर, नारो शंकर, विठ्ठल शिवदेव इत्यादि पुरुषांचे पत्रव्यवहार सांपडल्यावांचून इतिहासाची गुंतागुंत नीट उलगडावयाची नाही. माझ्या मते खाली दिलेल्या स्थळी बारीक शोध केला असतां उपयोग होईल. १ अयोध्या. २ काशी. ३ अलीगड. ४ पानिपत. ५ चरखारी. ६ बंदी. ७ कोटा. ८ भोपाळ. ९ ग्वालेर. १० जयपूर. ११ जोधपूर. १२ इंदूर. १३ देवास. १४ धार. १५ उज्जनी. १६ महेश्वर. १७ ओंकार. १८ ब-हाणपूर. १९ नागपूर. २० अलजपूर. २१ अमदाबाद. २२ बडोदें.२३ मालेगांव. २४ विंचूर. २५ नाशीक. २६ जव्हार. २७ अल्लीवाग. २८ मुंबई. २९. औरंगाबाद. ३० अहमदनगर. ३१ पेडगांव. ३२ हैद्राबाद. ३३ बीड. ३४ पैठण. ३५ सातारा. ३६ वाई. ३७ ओझर्डे. ३८ तासगांव. ३९ कोल्हापूर. ४० तालीकोट. ४१ सावंतवाडी. ४२ सावनूर. ४३ गुत्ती. ४४ बेदनूर. ४५ श्रीरंगपट्टण. ४६ हँसूर. ४७ तंजावर. ४८ मद्रास. ४९ उदेपूर. ५० आनंदवल्ली. ५१ सासवड. ५२ हिंवरें. ५३ कोरेगांव. ५४ कोपरगांव. ५५ अकोळनेर. ५६ जुन्नर. ५७ खेड. ५८ चास. ५९ वाफगांव. ६० चाफळ. ६१ लिंब. ६२ टेंभुर्णी. ६३ विजापूर. ६४ औंध. ६५ महाड. ६६ काळेगांव. ६७ मुधोळ.६८ कितूर. ६९ गुलबुर्गा. ७० तळेगांव. ७१ चिंचवड. ७२ सागर. ७३ दिल्ली. ७४ निर्मळ. ७५ वारंगळ. ७६ बेदर. ७७ अक्कलकोट. ७८ जत. ७९ फलटण. ८० पुणे. ८१ चांभारगोंदें. ८२ पंढरपूर. ८३ कायगांव. ८४ सुरत. ८५ वसई. ८६ पन्हाळा. ८७ निपाणी. ८८ कागल. ८९ शिरें. ९० रामनाथ. ९१ मलखेड.९२ कल्याण. ९३ भिवडी. ९४ जेजूरी. ९५ रामदुर्ग. ९६ भरतपूर. ९७ कर्णोल. ९८ कडाप्पा. ९९ जिंजी. १०० चांदवड. १०१ पाटस. १०२ इचलकरंजी. १०३ भोर. १०४ बारामती. १०५ कन्हाड. १०६ मलकापूर. १०७ वीरवाल्हे. १०८ धावडशी. १०९ सोनोरी. ११० पेण. १११ पांडववाडी. ११२ बावधन. ११३ सुपें. ह्या व अशाच आणखी इतर स्थली काहीना काही तरी कागदपत्र हटकून सांपडेल. ह्यांपैकी काही स्थली तर मोठमोठी दफ्तरेच आहेत. ती कित्येक ठिकाणी संस्थानिकांच्या ताब्यांत आहेत व कित्येक ठिकाणी जहागीरदार व इनामदार ह्यांच्या ताव्यांत आहेत. ह्या दफ्तरांतील जमीनजुमला व मानपान ह्यासंबंधीचे जे कागदपत्र, सनदा वगैरे