पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गांसंबंधी आहेत. सर्वांत १७५२ सालची पत्रे फार आहेत ह्मणजे सुमारे २० आहेत, ५१सालची सुमारे १४ आहेत, ५४ सालची १४, ५५ सालची १०,४७ सालची १०, ५९ सालची ६, ५६,५७,६० व ६१ सालांची पांच पांच, ४० व ५८ सालांची चार चार, ४६ सालची ३, ४१ ची ३, ५६ ची २, ४८ - १ व ४२,४३,४४,४९ व ५० ह्या सालांची मुळीच नाहीत. ह्या सालवारी पत्रांची एकंदर संख्या ११७ होते. १५९ पैकी बाकी ४२ राहिली. ती विशेष महत्वाची नसल्यामुळे त्यांचे सालवारी वर्गीकरण केले नाही. (ब) ऐतिहासिकलेखसंग्रहांत बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंतची एकंदर ३२ पत्रं आहेत. हा संग्रह सवंद छापून झाल्यावर ह्यांत माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, रघुनाथ बाजीराव, माधवराव नारायण व अंशतः बाजीराव रघुनाथ इतक्यांच्या कारकीदींचा एकदेशीय इतिहास येईल. आजपर्यंत माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील सुमारे तीनशे पढ़ें ऐतिहासिकलेखसंग्रहांत आली आहेत. (क) भारतवर्षांत आजपर्यंत एकंदर ४९ पत्रे छापिली आहेत. पैकी लेखांक १९, ३९, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९ ही आठ पत्रे बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील आहेत. लेखांक १९ हे पत्र विविधज्ञानविस्तारांत व लेखांक ४० हे पत्र थोरले शाहूच्या चरित्रांत पूर्वीच छापिलेली आहेत. ह्या मासिकपुस्तकांतील पत्रांतून व बखरीतून मोडी वाचनाच्या चुका अतोनात झाल्या आहेत. पत्रांना टीपा दिल्या आहेत त्याहि ऐतिहासिक माहितीला धरून नाहीत. ७. तेव्हां पुढील दहा वीस वर्षांतील इतिहासजिज्ञासूंचे पहिले काम हटले ह्मणजे अस्सल कागदपत्रे शोधून काढून ती छापण्याचे आहे. ऐतिहासिक कागदपत्र महाराष्ट्रांत शेंकडों ठिकाणी आहेत. हिंदुस्थानांतहि पुष्कळ ठिकाणी आहेत. हिंदुस्थानच्या बाहेर झणजे अफगाणिस्थान, इराण इत्यादि देशांत व लिस्बन, परिस, लंडन व आम्स्टर्डाम इत्यादि शहरांत मराठ्यांच्यासंबंधी कागदपत्र सांपडण्यासारिखे आहेत. ब्रिक्स, ग्रांट्डफ, म्याकेंझी इत्यादि गृहस्थांनी विलायतेंत नेलेले कागदपत्र लंडन येथे जाऊन शोधिले पाहिजेत. सध्यां मिरजमळा येथें माधवरावं बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, रघुनाथ बाजीराव व माधवराव नारायण यांच्या कारकीर्दीतील पवें उपलब्ध झाली आहेत. मेणवली येथे माधवराव नारायणाच्या सबंद कारकीर्दीसंबंधी पत्रे शाबूत आहेत. शिवाजी, संभाजी, राजाराम व बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कारकीर्दीसंबंधी अजून काहीच उपलब्ध झाले नाही. मुख्यतः शिवाजी महाराजासंबंधी पत्रे सांपडली पाहिजेत. महाराजांना जाऊन काही फार काळ झाला नाही. सव्वा दोनशे वर्षे अद्यापि व्हावयाची आहेत. शिवाजी महाराज व त्यांचे सरदार व मत्सद्दी यांनी लिहिलेली पत्रे लक्षावधि असली पाहिजेत. शिवाजी महाराजांचा पसारा केवढा ! त्यांचा पराक्रम कसला अकटोविकट आणि त्यांचे धोरण किती लांबवर ! तेव्हां