पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतील त्यांच्याशी इतिहासज्ञांना फारच थोडे कर्तव्य आहे. इतिहासज्ञांची उडी झटली ह्मणजे राजकीय, दरबारी, यौद्धिक, औद्योगिक, कार्षिक, व्यापारीक, नैय्यायिक, लौकिक, व्यावहारिक इत्यादि कागदपत्रांवर विशेष असणार. तेव्हां असला पत्रव्यवहार इतिहासजिज्ञासूंच्या स्वाधीन करण्यास दफ्तरांच्या मालकांस कोणतीच हाकत वाढू नये. इ. स. १८०० पूर्वीचा कोणताहि पत्रव्यवहार दासविण्यास हिंदुस्थानांतील कोणत्याहि मराठ्या संस्थानिकाला किंवा जहागीरदाराला काहीच अडचण नाही. स्वतः आपापलों दफ्तरें छापून काढिल्यास त्यांनी आपले कर्तव्य केलें असेंच होईल. निदान, जी बाहेरची इतिहासजिज्ञासु मंडळी त्यांच्याकडे येतील त्यांना ती दफ्तरे दाखविल्यास इतिहासज्ञ त्यांचे उपकार कालावधि विसरणार नाहीत. शिवाय ही दफ्तरे दाखविण्यांत व प्रसिद्ध करण्यांत त्यांचे फायदे आहेत. [१] विस्मृतीच्या सर्वव्यापी अंधारांत ते व त्यांची घराणी गुप्त होऊन जाणार नाहीत. शिवाजीराजे उदयास येण्यापूर्वी मुसुलमानांची सत्ता महाराष्ट्रांत निरनिराळ्या स्थली दीडशे, दोनशे व तीनशे वर्षे होती. त्या काली महाराष्ट्राच्या काही भागांत मराठ्यांचंहि राज्य होते. दक्षिणेत मुसुलमान येण्यापूर्वी जाधव, शेलार, चालुक्य, राष्ट्रकट, आंध्रभृत्य, शालिवाहन इत्यादि राजकुले आळीपाळीने बारा पंधराशे वर्षे राज्य करीत होती: परंतु, ह्या सर्व मराठी राजांचा व पातशाहांचा इतिहास त्यांच्या नांवांपलीकडे फारसा कांहींच माहित नाही. त्यांची नांवे देखील लोपून जावयाची; परंतु, पुराणे, ताम्रपट व तवारिखा आहेत ह्मणून ती तरी अद्याप ऐकू येतात. महाराष्ट्रातील संस्थानिकांच्या व जहागीरदारांच्या पूर्वजांच्या नांवांचीहि हीच दुर्दशा होण्याची वेळ आली आहे. तेव्हां ती टाळावयाची असल्यास ह्या संस्थानिकांनी व जहागीरदारांनी आपापली दफ्तरें होईल तितकी त्वरा करून स्वतः प्रसिद्ध करावी किंवा प्रसिद्धीकरितां इतिहासशोधकांच्या स्वाधीन करून टाकावी. [२] त्यांच्या पूर्वजांचे पराक्रम ऐकून त्यांच्या घराण्याविषयी महाराष्ट्रांतील लोकसमहास आदर व पूज्यता वाटू लागेल. सध्यां, अमक एका घराण्याचे पूर्वज मोठे होत ह्या पलीकडे काहाच माहिती नसते. ह्या निर्गण मोठेपणाचें सामान्य जनास ध्यान कारतां येत नाही. तेव्हा हे माठपण सगुण व साकार झाले असतां ह्मणजे ह्या मोठ्या पुरुषांनी कोणकोणते पराक्रम केले ह्याची तारीखवार अशी भरपूर माहिती मिळाली असतां, लोकांना त्यांच्या मोठेपणाची व्यवस्थित कल्पना येईल. त्यांच्या घराण्याचा लोकांना आदर वाट लागला ह्मणजे त्यांचे स्वभावसिद्ध धुरीणत्व सर्वत्र मान्य होईल . [४] व आपण लोकसमूहाचे धुरीण आहों, असें ह्या संस्थानिकांना व जहागीरदारांना बाट लागले ह्मणजे ते, पूर्वजांच्याच नावाने नव्हे ,तर स्वतःच्या गुणांनी लोकादरास पात्र होण्यास तयारी करूं लागतील.