पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंमत शेवटपर्यंत सोडिली नाही. आपल्या सैन्यांतील लोक एकदिलाने लढतील याची भाऊला शंका नव्हती. शिवाय यवनांनी कधी पाहिला नव्हता असला तोफखाना भाऊच्या पदरी होता. सारांश, भाऊ सैन्याच्या उपकरणांच्या बाबतींत अबदालीहून सर्वप्रकारें श्रेष्ठ होता. परंतु एका गोष्टीत १५ नोव्हेंबरच्या पुढे भाऊचे व्यंग पडू लागले. ते हे की, अबदालीला रसद अतर्वेदीतून यथेच्छ मिळू लागली व भाऊची रसद दिल्लीकडून येण्याचे मान दिवसेंदिवस कमी होत चाललें. अबदालीला उठवून लढाईला आणण्याचा भाऊनें वारंवार प्रयत्न केला. परंतु, अबदाली चिरडीस जाऊन आपल्या गोटाच्या बाहेर स्वतः बरेच दिवस पडला नाही. अबदालीच्या मनांत निराळाच डाव होता. जी विपत्ति अबदाली १५ नोव्हेंबराच्यापूर्वी स्वतः भोगीत होता तीच किंवा त्याहूनहि भयंकर अशी विपत्ति आतां मराठ्यांना भोगण्याची पाळी आली. तेव्हां उपासमारीने मराठ्यांना पूर्ण जेरीस आणून मग त्यांचे यथेच्छ पारिपत्य करण्याचा अबदालाने बेत केला. भाऊ या वेळी अबदालोच्या कचाटींत पक्का सांपडला. १५ नोव्हेंबरपासून १४ जानेवारी १७६१ पर्यंत मराठी सैन्याची आस्ते आस्ते उपासमार होत चालली होती. तरी भाऊची उमेद व हिंमत जशी होती तशीच होती. २३ नोव्हेंबराला अवदालीचे व भाऊचें पहिले ह्मणण्यासारखें युद्ध झाले. (टीप ३२३ नानाफडणिसाचे पत्र ). त्याच्या अगोदर ८ नोव्हेंबराला कृष्ण जोशी संगमेश्वरकर गोळा लागून ठार झाला होता. २३ नोव्हेंबरच्या लढाईत जनकोजी शिंद्यांच्या हस्तें अबदालीचा पराजय झाला. त्यांजकडील सहाशेपावेतों माणूस जाया झाले व आपल्याकडील दोन अडीचशंपर्यंत झाले. आपल्या सैन्याने त्यांच्या लोकांना त्यांच्या गोटांत नेऊन घातले. पुढे दुसरे युद्ध ७ डिसेंबरी अस्तमानीं झालें ( नानाचे पत्र ). त्यांतहि अबदालीचाच पराजय झाला. त्याजकडील दीड हजार माणूस त्यांच्याच आराव्यापुढे पडले होते. आपल्या आराब्यापुढे त्याजकडील माणूस किती पडले होते त्याचा नानाफडणिसाने आंकडा दिला नाही. आपल्याकडील सुमारे दीडशें माणूस ठार व पांच सहाशे जखमी झाले होते. ह्यावरून ह्याहि लढाईत मराठ्यांना जय मिळाला होता हे स्पष्ट आहे. परंतु ह्या लढाईत एक मोठी हानि झाली. बळवंतराव मेहेंदळे ठार झाला. त्यामुळे तिकडील लोकांना बहुत समाधान झाले. आपली मदत नसतांहि, उलट आपण होईल तितकी कुचराई केला असताहि भाऊसाहेबांचे सैन्य उत्तरोत्तर विजयाच होत चालले आहे. हे ऐकन व नारो शंकरादि. मंडलीने तोंडांत शेण घातले तेव्हां गोविंदपंताच्या मनांत कांही निराळी भावना होऊन, पतमजकुरांनी चार लाख रुपये घेऊन दिल्लीचा रस्ता धरिला. गं. विंदपताला दिल्लीकडे येण्यास दुसरेहि एक कारण झाले. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वतः पंचवीस तीस हजार फौज घेऊन भाऊच्या साहाय्यास कुच करून निघाले व समारें बहाणपऱ्यापर्यंत आले, ही बातमी गोविंदपंताला कळली. तेव्हां श्रीमंतापाशी अत्रू राहावी ह्या हेतूने गोविंदपंत २२ डिसेंबराच्या सुमाराला दिल्लीस आला. आणिलेली रक्कम नारो शंकराच्या